संजय राऊतांची प्रकृती गंभीर; २ महिने राजकारणापासून दूर, सत्याचा मोर्चालाही जाणार नाहीत, नेमकं काय झालंय?

MP Sanjay Raut Steps Away Amid Health Problems: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तब्येतीच्या कारणास्तव २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यापासून दूर. कार्यकर्त्यांना पत्र पाठवून दिली माहिती.
Sanjay Raut Under Medical Observation
Sanjay Raut Under Medical ObservationSaam Tv
Published On
Summary
  • खासदार संजय राऊतांच्या प्रकृती गंभीर

  • २ महिने सार्वजनिक आयुष्यातून राहणार दूर

  • पत्रक प्रसिद्धी करून दिली माहिती

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती आहे. अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांनी काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Sanjay Raut Under Medical Observation
प्रसिद्ध कथावाचकाचं अश्लील कांड; कारमध्ये महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं, नागरिकांनी चोप देत शेंडी कापली

वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं किंवा गर्दीमध्ये मिसळणं यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संजय राऊत सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Sanjay Raut Under Medical Observation
MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विटर हँडलवरून कार्यकर्त्यांसाठी पत्रक प्रसिद्ध केलं. या पत्रात त्यांनी प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती दिली. तसेच २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, यानंतर प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या आजाराबाबत माहिती दिली.

संजय राऊतांनी पत्रात नेमकं म्हटलं काय?

जय महाराष्ट्र

'आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून प्रेम दिलं. मात्र, अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय. सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून मी लवकरच बरा होईन. वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. या गोष्टीला आता नाईलाज आहे. मला खात्री आहे मी लवकर ठणठणीत बरा होईल. नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या भेटीस येईन'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com