नाशिक महानगरपालिकेत कुंभमेळ्यापूर्वी मोठी भरती प्रक्रिया सुरू.
एकूण ३४८ रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार.
टीसीएसमार्फत अर्ज प्रक्रिया पार पडणार.
अभियंते आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची भरती जलद गतीने होणार.
नाशिक : गेल्या अनेक वर्षेांपासून रखडलेल्या भरतीला अखेर मुहूर्त लागला असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अग्निशमनच्या २४६ व तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या १४० रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लाभला आहे. टीसीएसमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महापालिकेच्या क वर्गीय आस्थापना परिशिष्ठावरील ७७२५ मंजूर पदांपैकी सुमारे साडेतीन हजार पदे रिक्त आहेत. महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारीत आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. दरम्यान, कोरोनाकाळात वैद्यकीय, आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती.
या नोकरभरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) सोबत करार देखील करण्यात आला आहे. मात्र, या भरतीसाठी दिलेली आस्थापना खर्च मर्यादा शिथिल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने ही भरती होऊ शकली नव्हती. अग्निशमन तसेच अभियंता संवर्गातील अभियंता संवर्गातील पदाच्या भरतीसाठी बिंदू नामावलीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीसाठी सादर केला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला असून या प्रक्रियेला वेग आला आहे.
खर्चाची अट शिथील
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेस भेडसावणारा मनुष्यबळाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचल्यानंतर शासनाने तांत्रिक संवर्गातील १४० पदांच्या भरतीला काही महिन्यांपूर्वी तर अग्निशमन विभागातील २४६ पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार अभियंते व अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी टीसीएसमार्फत प्रक्रिया राबविली जाणार आहे.
एकुण मंजूर पदांतून सरळसेवा पदभरती करावयाचे पदे
पद मंजुर पदे भरती होणारी पदे
उप अभियंता (यांत्रिकी) १२ ०३
उप अभियंता (विदयुत) ०८ ०२
सहाय्यक अभियंता (वाहतुक) ०२ ०१
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ६१ ४६
सहाय्यक अभियंता (विद्युत) ०३ ०३
कनिष्ठ अभियंता (विद्युत) ०९ ०७
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) २१ २१
सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) ०४ ०४
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १२ ०९
कनिष्ठ अभियंता (वाहतुक) ०४ ०३
सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४३ ३२
सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) ०७ ०५
स्टेशन ऑफिसर ०६ ०३
सब ऑफिसर १८ ०९
फायरमन (अग्निशामक) २९९ १९८
---------------------------------------------------------------------------------------------------
एकुण ५०९ ३४६
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.