ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हे नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा.
लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी आहारात पालक, मेथी आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. या भाज्या लिव्हरला डिटॉक्स करण्यात मदत करतात.
सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षणता वाढते आणि शरीर डिटॉक्स होते.
आलं आणि हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. हे लिव्हर स्वच्छ करुन कार्यक्षमता वाढवतात.
अल्कोहोल आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने लिव्हरवर दबाव येतो आणि लिव्हरशी संबधित आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणून यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या. शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्यायल्याने लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.