

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना आग्रा येथून अटक.
अटक आरोपींमध्ये नरेशकुमार माहोर, संजयकुमार शर्मा आणि बाबूलाल कुशवाहा यांचा समावेश.
या कारवाईनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 10 वर पोहोचली.
भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आलीय. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आणखीन तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नरेशकुमार पुरणचंद माहोर , संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा , बाबूलाल नारायणसिंह कुशवाहा असे अटक आरोपींची नावे आहेत. या तिघांना आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत टीईटी फुटी प्रकरणांमध्ये १० आरोपींना अटक करण्यात आलीय.
आता अटक करण्यात आलेल्या तिघांनी प्रश्न पत्रिका बाहेर काढल्याचा संशय आहे. महिम पत्रण प्रा. लि. प्रिंटिंग प्रेस आग्रा येथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत टीईटी फुटी प्रकरणांमध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या चेकची पडताळणी, आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा तपास करण्यात येत आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक व (SIT) स्थापन करण्यात आले आहे. राज्यभरातील नेटवर्कचा शोध घेतला जातोय.
हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी 'मकोका' लावण्यात येईल का याची पडताळणी केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.