Beed News: बीड मिशिदीत भयानक स्फोट, २ आरोपींना बेड्या, स्फोटामागचं कारण काय?

Mosque explosion Beed News: बीड जिल्ह्यातील अर्धमसला येथील मशिदीत जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट घडविण्याच्या प्रकरणात २ तरूणांना अटक करण्यात आली आहे.
Beed Mosque Explosion:
Beed Mosque Explosion:Saam Tv News
Published On

बीडमधील अर्धमसला येथील मशीद स्फोटप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आरोपी अर्धमसला गावातील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक भांडणातून आणि नशेच्या अधीन जाऊन हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मशिदीत जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्पॉट घडवून आणला होता. या भयानक स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या होत्या. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आता दोघांना अटक केली आहे.

Beed Mosque Explosion:
Pune: पुणे - हावडा रेल्वेसेवा १२ दिवसांसाठी बंद, कोणती एक्स्प्रेस बंद अन् कोणती धावणार?

श्रीराम सागडे आणि विजय गव्हाणे असे २ आरोपींची नावे आहेत. हे आरोपी अर्धमसला गावातील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत. विजय गव्हाणे या आरोपीवर अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्याचे आई वडील हे अपंग असून, ते शेतीचे काम करतात. तर, श्रीराम सागडे याचे आई-वडील देखील शेतीचे काम करतात.

Beed Mosque Explosion:
Nirmala Navale: पुण्यातील महिला सरपंचावर महाराष्ट्र फिदा; मनमोहक PHOTO पाहिलेत का?

मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी आरोपींनी इन्स्टाग्रामवर बनवला रील

बीडच्या अर्धमसला या गावात मशिदीत स्फोट घडवून आणण्यापूर्वी दोन्ही आरोपींनी इन्स्टाग्रामवर रील तयार केले होते. 'शिस्तीत राहा बेट्या. मी अंगार भंगार नाय रं' या गाण्यावर त्यांनी रील तयार केलं होतं. या व्हिडिओमध्ये आरोपीच्या हातात जिलेटिनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे. स्फोट घडल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com