Bhagyashree Kamble
उच्चशिक्षित सरपंच म्हणून निर्मला नवले यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे.
निर्मला नवले यांनी नुकतंच सोशल मीडियावर गुढी पाडवा साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
गडद निळा आणि हिरव्या रंगाच्या साडीवर निर्मला यांचं सौंदर्य खुलले आहे.
निर्मला यांनी गुढी पाडवा साजरा करत असतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंवर निर्मला नवले यांनी कॅप्शन देखील दिलं आहे.
'सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्यासाठी भरभराटीचे, आनंदाने भरलेले आणि यशाने नटलेले असो'.
'चला आपण सर्वजण एकत्र येऊन समाजासाठी, गावासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक उत्तम भविष्य घडवूया', असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे.
यापूर्वी त्यांनी वटसावित्रीच्या पोर्णिमेदिवशी देखील खास पोस्ट शेअर केली होती.
निर्मला यांचे अनेक फोटो व्हायरल होतात.