Pune: पुणे - हावडा रेल्वेसेवा १२ दिवसांसाठी बंद, कोणती एक्स्प्रेस बंद अन् कोणती धावणार?

Railway Work Disrupts Pune-Howrah Express Trains: पुण्यातील सर्वाधिक गर्दी असलेल्या पुणे हावडा मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या बारा दिवस बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Pune
PuneSaam Digital
Published On

पुण्यातील सर्वाधिक गर्दी असलेल्या पुणे हावडा मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेस बारा दिवस बंद राहणार आहेत. बिलासपूर रेल्वे विभागातील कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या कामाचा सर्वाधिक फटका आझाद हिंद एक्सप्रेसला बसणार आहे. त्यामुळे रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होणार आहे.

बंद राहण्याचे कारण

उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. रेल्वेला प्रवाशांची आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. पण रेल्वेकडून बिलासपूर विभागातील रायगड झारसुगुंडा जंक्शनमध्ये कोटारलिया स्थानकावरील चौथ्या मार्गावरील कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यात येणार आहे. ११ ते १३ एप्रिल दरम्यान, हे काम चालू राहणार आहे.

Pune
Nirmala Navale: पुण्यातील महिला सरपंचावर महाराष्ट्र फिदा; मनमोहक PHOTO पाहिलेत का?

कोणकोणत्या गाड्या प्रभावित

कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे महत्त्वाच्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. बंद राहणाऱ्या गाड्यांमध्ये आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस, आणि संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. हे काम ११ ते २३ एप्रिल दरम्यान सुरू राहील. उन्हाळी सुट्टीच्या प्रवासी हंगामातच हे काम घेतल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Pune
Pune News: 'दागिने माझ्याकडे दे, तु लिंबू घेऊन पुढे जा'; महिला चालतच राहिली..भोंदूबाबा मागून 'नौ दो ग्यारह'

रेल्वे गाड्या आणि रद्द करण्यात आलेली तारीख

संत्रागाची पुणे एक्स्प्रेस १२ आणि १९ एप्रिल रद्द

पुणे संत्रागाची एक्स्प्रेस १४ आणि २१ एप्रिल रद्द

पुणे हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ११ ते २४ एप्रिल रद्द

हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस ११ ते २४ एप्रिल रद्द

हावडा पुणे दुरांतो एक्स्प्रेस १०, १२, १७ आणि १९ एप्रिल रद्द

पुणे हावडा दुरांतो एक्स्प्रेस १२, १४, १९ आणि २१ एप्रिल रद्द

या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन आधीपासून करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com