Pune News: 'दागिने माझ्याकडे दे, तु लिंबू घेऊन पुढे जा'; महिला चालतच राहिली..भोंदूबाबा मागून 'नौ दो ग्यारह'

Fake Spiritual Guru Arrested for Stealing Jewels: हडपसर पोलिसांनी घरावर संकट असल्याची बतावणी करून साडेतीन लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केली आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam
Published On

जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुटणाऱ्या भोंदूबाबाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूबाबाने महिलेला घरावर संकट येणार असल्याचे सांगत दागिने आणायला सांगितले. नंतर दागिने मंतरून त्याने प्लास्टिक पिशवीत ठेवले. नंतर आरोपी दागिने घेऊन पसार झाला. महिलेला कळताच तिने पोलीस धाव घेतली आणि भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले आहे.

महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या पतीला दारूचे व्यसन होते. दोन वर्षांपूर्वी महिला आपल्या पतीला घेऊन खेडच्या कण्हेरसर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथे आरोपी नीळकंठ सूर्यवंशी त्यांना भेटला. त्या वेळी सूर्यवंशीने महिलेच्या पतीला दारू सोडण्यास सांगितले. भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेच्या पतीने दारू सोडली. यानंतर महिलेला भोंदूबाबावर विश्वास बसला.

Pune Crime
Buldhana News: 'माझ्या जीवाला धोका', कुऱ्हाड घेतली अन् काकाच्या डोक्यातच घातली, पुतण्याचा प्रताप

त्यानंतर २५ मार्च रोजी त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. 'तुमच्या घरावर संकट आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर सूर्यवंशीने २७ मार्च रोजी महिलेला हडपसर गाडीतळ परिसरात बोलावून घेतले. 'भेटायला येताना मंगळसूत्र, मुलीची सोनसाखळी घेऊन या. मी तुम्हाला दागिने मंतरून देतो', असे त्याने सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास महिलेने सूर्यवंशीची भेट घेतली.

Pune Crime
Crime: बुलाती हैं मगर जानेका नहीं! २ बहिणींनी सराफाला घरी बोलावून घेतलं आणि मग..जे घडलं ते भयंकर

दोघांनी एका रसवंतिगृहात रस प्याला. त्यानंतर त्याने महिलेला एक लिंबू दिला. महिलेकडील दागिने मंतरून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र, सुवर्णहार, सोनसाखळी असा ऐवज प्लास्टिक पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिन्यांची पिशवी त्याने स्वत:कडे ठेवली. महिलेला लिंबू घेऊन पुढे चालण्यास सांगितले. मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या, असे त्याने सांगितले. त्यानंतर दागिने असलेली पिशवी घेऊन सूर्यवंशी पसार झाला. महिलेने मागे वळून पाहिले, तेव्हा सूर्यवंशी पसार झाल्याचे लक्षात आले.

महिलेने त्याचक्षणी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडले. त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त केले. सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सूर्यवंशीला न्यायालयात हजर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com