दोन बहिणींनी एका ज्वेलर्सला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. बहिणींनी आधी सराफाला ३५ फोन केले. नंतर त्यांना घरी बोलावून बहिणींनी भावासह सराफाची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी सराफाच्या खिशातून दुकानाच्या चाव्या घेतल्या आणि सर्व दागिने चोरून नेले. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अल्पवयीन बहिणींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या दुबग्गा पोलिस स्टेशनमधील सीता विहार कॉलनीमध्ये घडली आहे. रूप नारायण सोनी यांचे या परिसरात पवन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. डिसेंबर २०२४ साली, या भागातील एका महिलेने तिचे दागिने गहाण ठेवून रूप नारायण सोनी यांच्याकडून ६५,००० रुपये उधार घेतल्याचे सांगितले जाते. महिलेला ६५ हजार रुपयांवर दरमहा ८ हजार रुपये व्याज द्यावे लागत होते. महिलेने दोन महिन्यांचे व्याज दिले. पण त्यानंतर ती पैशांअभावी देऊ शकली नाही.
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
आरोपांनुसार, रूप नारायण सोनी महिलेच्या घरी जाऊन तिच्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्ये केले होते. यामुळे त्रासलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींनी त्यांच्या माहेरी आणि चुलत भावांकडे तक्रार केली. दोन्ही अल्पवयीन मुलींनी त्यांच्या भावांसोबत मिळून एक प्लान आखला. प्लाननुसार, सराफाला घरी बोलावून त्याची हत्या केली.
विटांनी वार करून ज्वेलर्सचा मृत्यू
सराफाला घरी बोलावून त्याच्या डोक्यावर विटेने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर बहिणींनी त्याच्या खिशातील दुकानातील चाव्या काढून दुकानावर डल्ला टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींचे भाऊ जे या कटात सामील झाले, आरोपी गोलू आणि विनय रुग्णवाहिका चालवतात. दोघांनीही ज्वेलर्स रूप नारायण सोनी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि एका जागी फेकून दिला.
मग ते सर्वजण रूप नारायण सोनी यांच्या दुकानात पोहोचले. त्यांनी दुकान उघडले आणि दागिने पसार झाले. दुकानातून दागिने लुटले जात असताना, दोन्ही अल्पवयीन बहिणी रस्त्यावर पहारा देत होत्या. पोलिसांनी आता या हत्येप्रकरणी गोलू, विनय कुमार आणि हंसराज या तीन आरोपींना अटक केली आहे आणि दोन्ही अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.