TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

TCS Nashik Conversion Case Full Charge Sheet Details: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले असून पोलिसांच्या चार्जशीटमध्ये ब्रेनवॉश, विनयभंग आणि आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप उघडकीस झाले आहेत.
Police investigation intensifies in Nashik TCS conversion case as shocking details emerge in charge sheet.
Police investigation intensifies in Nashik TCS conversion case as shocking details emerge in charge sheet.Saam tv
Published On

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील TCS महिला कर्मचारी आणि धर्मांतर प्रकरणात आता धक्कादायक आणि मोठे खुलासे झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये अनेक अनेक संतापजनक आणि तितक्याच गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडितेचे धर्मांतर करण्यासाठी तिला इस्लाम अप डाऊनलोड करून देण्यात आले होते.

Police investigation intensifies in Nashik TCS conversion case as shocking details emerge in charge sheet.
Special Report : Maratha Reservation News | मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे दिल्लीत?

तसेच ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये तिच्यासोबत अश्लील चाळेही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चार्जशीटमध्ये 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि छळाचा संपूर्ण घटनाक्रम आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या या अधिकृत दोषारोपपत्रात थेट कट्टरवादी झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख केला आहे. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवण्यात आले होते, असा खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे. सोशल मीडियावर असलेले झाकीर नाईकचे व्हिडिओ वापरुन तिचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला जात होता.

Police investigation intensifies in Nashik TCS conversion case as shocking details emerge in charge sheet.
Wai Tourism : 'राजा शिवाजी'चे शूटिंग झालेल्या 'वाई'मधील ५ ऐतिहासिक ठिकाणे, आताच प्लान करा उन्हाळी सहल

ऑफिसच्या पॅन्ट्रीत विनयभंग आणि पैशांची लूट

या प्रकरणातील आरोपी दानिशने पीडितेचे शारीरिक शोषण केले नाही तर तिच्याकडून महागड्या वस्तू आणि मोठी रक्कमही लुबाडली. तर दूसरा आरोपी तौफिक अत्तारने थेट ऑफिसच्या पन्ट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग करत तिच्या शरीराराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात प्रबळ पुरावे सादर केले असून दोषीना कडक शिक्षा ह्वावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com