नोटा उधळल्या, कलाकेंद्रात छमछम, पोलिसांसमोर डान्सबारची कला; सुरेखा पुणेकरांचा आरोप

Surekha Punekar on Cultural Center : ढोलकीचा ताल आणि लावणीचा ठसका, ही आहे महाराष्ट्राची लोककला आहे. ही कला जपली जावी म्हणून कला केंद्र शासनमान्येतेने सुरु करण्यात आली.
Surekha Punekar alleges that there is a dance bar in Cultural Center
Surekha Punekar alleges that there is a dance bar in Cultural CenterSaam Tv News
Published On

मिताली मठकर, साम टीव्ही

महाराष्ट्राची लोककला जपण्यासाठी शासनाने मान्यता दिलेल्या कलाकेंद्रात डान्सबार सुरु असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. राज्यात किती कलाकेंद्रात डीजे चालतो? आणि त्यामुळे कलावंतांवर काय परिस्थिती ओढावलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ढोलकीचा ताल आणि लावणीचा ठसका, ही आहे महाराष्ट्राची लोककला आहे. ही कला जपली जावी म्हणून कलाकेंद्र शासनमान्येतेने सुरु करण्यात आली. मात्र आता याच कलाकेंद्रांना डीजेच्या दणदणाटाचं ग्रहण लागलंय. राज्यातील ८२ कलाकेंद्रापैकी ४५ कलाकेंद्रांवर डान्स बार सुरु असल्याचा खळबळजनक आरोप लावणी कलावंत सुरेखा पुणेकरांनी केलाय.

Surekha Punekar alleges that there is a dance bar in Cultural Center
Chhaava : 'छावा' सिनेमावर बंदी आणा, अमित शाहांना कोणाचं पत्र? दंगलीचं खापर 'छावा'वर?

लावणीच्या सादरीकरणासाठी आणि त्यांच्या सरावासाठी राज्यात कलाकेंद्र सुरू करण्यात आली. यात अनेक संगीत पार्ट्या आणि संगीतबारीची व्यवस्था करण्यात आली. त्यात दिवसभर कलेचा सराव आणि रात्री प्रेक्षकांसमोर त्यांच सादरीकरण आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कलावंत आपला उदरनिर्वाह करतात. ढोलकी, हार्मोनियम, तुणतुणं वादकांचा वावर असलेल्या कलाकेंद्रात डीजे घुसल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय. तर यातूनच २ कलाकारांचा जीव गेलाय.

राज्यात डान्स बारला बंदी असताना कलाकेंद्रात मात्र खुलेआम डान्सबार सुरु आहे. मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष का? हात ओले होत असल्याने पोलीस डान्सबारला अभय देतात का? कलाकेंद्राच्या आडून कलेचा गळा का घोटला जातोय? यावर सरकार ठोस उपाययोजना कधी योजणार? याकडे लक्ष लागलंय. मात्र सरकारने छमछम बंदीसाठी ठोस उपाय योजले नाही तर लावणी कलावंत नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित.

Surekha Punekar alleges that there is a dance bar in Cultural Center
Maungaro injection : नको जीम, नको रनिंग, इंजेक्शन घ्या, बारीक व्हा; लठ्ठपणावर करा मात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com