
मिताली मठकर, साम टीव्ही
जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरीकन कंपनीने एका इंजेक्शनचा शोध लावलाय. त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरीला या इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. यावरचाच हा रिपोर्ट
वजन कमी करायचं...माग आत्ता त्यासाठी जीममध्ये जाऊन घाम गाळणं नको..पहाटे उठून धावायला नको की . डाएट प्लॅन नको.. आत्ता आठवडयातून एकदा एक इंजेक्शन आणि तुमचं वजन कमी करायला सुरवात...लठ्ठपणानं त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील आघाडीची फार्मा कंपनी एली लिलीने भारतात वजन कमी करण्याचे औषध आणलं आहे 'माउंजारो' सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळाल्यानंतर हे औषध आता भारतातही उपलब्ध झालं आहे..
या इंजेक्शनमुळे 21 किलोपर्यंत वजन कमी होईल, चरबी नाहीशी होईल, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की हे औषध लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाइप 2 मधुमेहासाठी तयार करण्यात आले आहे. लठ्ठपणा कमी करणाऱ्या इंजेक्शनची किंमत भारतात खूपच कमी ठेवण्यात आली आहे. या औषधाच्या 5 एमजीच्या कुपीची किंमत 4375 रुपये आणि 2.5 एमजीच्या कुपीची किंमत 3,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
माउंजारोचं हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्यावे लागते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार, जे लोक योग्य आहार आणि व्यायामासह हे औषध घेत होते, त्यांनी 15 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये 72 आठवड्यात सुमारे 21.8 किलो वजन कमी केले. त्याच वेळी, 5 मिलीग्रॅम डोससह, त्याने 15.4 किलो वजन कमी केले आहे.
भारतात 10.1 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत
त्यामध्ये 5 ते 9 वर्षे वयोगटातील 1 कोटी 20 लाख
10 ते 19 वर्षे वयोगटातील 1 कोटी 40 लाख
20 ते 39 वर्षे वयोगटातील 3 कोटी 90 लाख
यावर तज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूया
खरतर धावणे, सूर्यनमस्कार, योगासने अशा उपायांनी वजन कमी करणे, तंदुरुस्त राहणे हा उत्तम मार्ग आहे. पण धावत्या जीवनशैलीत सगळ्यांकडेच वेळ कमी आहे. त्यामुळे ओबॅसिटी सर्जरीवर हे इंजेक्शन एक चांगला पर्याय ठरु शकेल. पण त्याचे किती सकारात्मक परिणाम दिसतात हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.