
भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावरच्या छावा सिनेमावर बंदीची मागणी करत थेट अमित शाहांना पत्र लिहिण्यात आलंय. मात्र ही मागणी कुणी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या छावा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सगळे रेकॉर्ड मोडले असले तरी आता हाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला छावा सिनेमा कारणीभूत असल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम जमातचे मौलाना शहाबुद्दीन रजवींनी केला आहे, आणि या मागणीसाठी त्यांनी थेट अमित शाहांनाच पत्र लिहिलंय.
मौलना शहाबुद्दीन यांनी अमित शाहांना लिहीलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं?
भारतीय मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानत नाही
औरंगजेब हिंदूविरोधी दाखवून हिंदूंना चिथावणी दिली जाते
छावा सिनेमामुळे नागपूरमध्ये हिंसाचार
छावावर बंदी घालून दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकावर कारवाई करावी
हा वाद फक्त छावा सिनेमापूरता नाही. तर यात इतिहास, धर्म आणि राजकारणाही असल्याचं दिसतंय. त्यामुळे छावा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव करणारा असला तरी या सिनेमामुळे धार्मिक तणाव वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री मौलना शहाबुद्दीन यांच्या पत्राला नेमकं काय उत्तर देणार? सरकार छावा सिनेमावर बंदी घालणार का? याबरोबरच हा वाद शमवण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करणार? याकडे लक्ष लागलंय. मात्,र सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.