महाविकास आघाडीतून विधानपरिषदेवर कोण जाणार? सुप्रिया सुळे यांनी थेट नावच सांगितलं

supriya sule on mlc elction : महाविकास आघाडीतून विधानपरिषदेवर कोण जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत मोठी मागणी केली.
Supriya Sule news
Supriya Sule news Saam Tv
Published On
Summary

उद्धव ठाकरे यांनीच लढावी विधान परिषदेची निवडणूक, खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उद्धव ठाकरेंना विनंती

सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. भाजपच्या वाट्याला ६ जागा येणार आहेत. तर महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. महाविकास आघाडीतून विधानपरिषदेवर कोण जाणार, याची उत्सुकता लागलेली असताना सुप्रिया सुळे यांनी लक्षवेधी पोस्ट केली आहे. विधानपरिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावे, अशी मागणी सुळेंनी पोस्ट करत केली. सुप्रिया सुळे यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानपरिषतदेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेसाठी १० जागांसाठी १२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल लागेल. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे.

Supriya Sule news
बारामतीची निवडणूक बिनविरोध नाही, राहुरीतही काँग्रेस उमेदवार देणार, शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

भाजपच्या काही इच्छुकांची नावे समोर आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काही इच्छुकांच्या नावांची देखील चर्चा होत आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावं, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Supriya Sule news
Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस देणार उमेदवार; 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत काय म्हटलं?

सुळे यांनी पोस्ट करत म्हटलं की, ' महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलीये. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धव ठाकरे हे राज्यातील ज्येष्ठ, अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. ठाकरे यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com