बारामतीची निवडणूक बिनविरोध नाही, राहुरीतही काँग्रेस उमेदवार देणार, शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

Rahuri Baramati by-election : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज झाली असून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam tv
Published On

Congress Baramati Rahuri by-election candidate announcement details : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षश्रेष्ठींनी पोटनिवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहितीही काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मित्रपक्षांसोबत चर्चेनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे बारामतीत पोटनिवडणूक होत आहे...तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केलीय. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेनंतर याबाबत अधिकृत निर्णय काँग्रेसकडून घेतला जाणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, या दोन्ही जागांवर यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे नियमानुसार या जागांवर पहिला हक्क त्यांचाच आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेस या जागांवर आपले उमेदवार उभे करण्यास पूर्णपणे तयार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या पोटनिवडणुका लढवण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांना हिरवा कंदील दिला आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून आणि त्यांच्या संमतीनेच अंतिम उमेदवार ठरवला जाणार आहे. "आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे; जर मित्रपक्षांना त्या ठिकाणी रस नसेल, तर काँग्रेस ती जागा लढवून महाविकास आघाडीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल," असे सपकाळ यांनी नमूद केले.

Sharad Pawar
राज्यातील सरकारी कंत्राटदार संपावर जाणार, ७ एप्रिलपासून रस्ते, पूल आणि विकासकामे ठप्प होणार

राजकीय समीकरणे बदलणार?

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत काँग्रेसने तेथे दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Maharashtra politics : राज्यात भाजपला आणखी ४ आमदार मिळणार, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी, कोण कोण इच्छुक?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com