दिवाळीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महागला! आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

Sugar Price Hike Before Diwali Retail Wholesale Rates India: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 4 रुपयांहून अधिक वाढ झाली असून किरकोळ दर 59.50 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यात साखरेचे दर किती आहेत? जाणून घ्या.
SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALI
SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALIsaam tv
Published On: 

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरातच बाजारामध्ये साखरेच्या दरात प्रतिकिलो 4 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एकीकडे साखरेचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे साखरेचे दर मात्र वाढत असल्याचे चित्र आहे.

SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALI
साखर कारखान्यांविरोधात शेतकरी आक्रमक, 100 टक्के भाव वाढीची मागणी

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, साखरेचा सरासरी किरकोळ दर प्रतिकिलो 59.50 रुपये, तर घाऊक दर 55.40 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या तुलनेत साखरेच्या साखरेच्या दरात प्रतिकिलो 12 ते 13 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी किरकोळ बाजारात साखरेचा दर 46.50 रुपये, तर घाऊक बाजारात 43.23 रुपये होता.

SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALI
Sugar Price Hike : दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना फटका! साखर इतक्या रुपयांनी महागली; आजचे ताजे दर किती?

तर राजधानी कोलकत्तामध्ये साखरेचे दर सर्वाधिक वाढल्याचे दिसून येत आहेत. 3 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात साखरेचा दर प्रतिकिलो 65 रुपये नोंदवण्यात आला. वर्षभरापूर्वी हाच दर 50 रुपये होता. तर दिल्लीत साखरेचा दर 64 रुपये आणि मुंबईत 61 रुपये प्रतिकिलो झाला आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत 46 रुपये, तर मुंबईत 45 रुपये प्रतिकिलो दर होता.

SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALI
Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

साखरेचे दर वाढण्यामागे नेमकं कारण काय?

2025-26 या हंगामात साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे बाजारात दरवाढीचा परिणाम झाला आहे. त्यातच सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, पिकांचं नुकसान, जागतिक बाजारपेठेतील मर्यादित पुरवठा आणि साखरेची साठेबाजी यामुळे दर आणखी वाढले आहेत. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घालणे, आयातीला प्रोत्साहन देणे आणि बाजारातील साठ्यांवर देखरेख ठेवणे यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच साखर कारखान्यांचा गाळप हंगामही लवकर सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.