साखर कारखान्यांविरोधात शेतकरी आक्रमक, 100 टक्के भाव वाढीची मागणी

Farmers' Agitation Followed by Workers' Strike Threat: राज्यातील साखर उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यानंतर आता ऊसतोड कामगार संघटना आक्रमक झाल्यात. संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी कोयता बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. कामगार संघटनांच्या मागण्या काय आहेत?
Maharashtra sugar industry
Maharashtra sugar industrysaam tv
Published On: 

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड कामगार आक्रमक झालाय. यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानंतर राज्यात सध्या गाळप हंगाम सुरू असून सर्वच साखर कारखाने सुरू झालेत. मात्र, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच आता ऊसतोड कामगारांनी कोयता बंद आंदोलनाची हाक दिलीये. राज्यातील 5 लाख ऊसतोड कामगार संपावर जाणार असून साखर उद्योग अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. 3 वर्षांचा करार संपल्यानं 100 टक्के भाववाढ करण्याची मागणी कामगारांनी केलीये. तसंच, जोपर्यंत लिखित करारानुसार भाववाढ होत नाही तोपर्यंत कोयता हातात न घेण्याचा पवित्रा कामगार संघटनांनी घेतलाय...

तर दुसरीकडे, उसाला दर जाहीर करून मगच कारखाने सुरू करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू असून शेतकरी संघटना अधिकच आक्रमक झाली.

हे कमी म्हणून की काय आता सोलापूरात ऊस दर संघर्ष समितीनं थेट आमदार-खासदार आणि साखर कारखानदारांना गावबंदी करण्याचा इशारा दिलाय..

यंदाच्या हंगामात पहिल्याच आठवड्यात 25 लाख टन ऊसाचे गाळप करून 1 लाख 55 हजार टन साखरेचे उत्पादन घेतलंय. मात्र, कामगारांनी संपाची हाक दिल्यामळे पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलीये. या भूमिकेमुळे आता राज्यातील साखर उद्योगाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आधीच शेतकरी आणि आता ऊसतोड मजूर एकाच वेळी आंदोलनावर गेल्यास साखर उद्योगावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या दोन्ही घटकांच्या मागणीबाबबत सरकार आणि कारखानदार काय तोडगा काढतात, हे पाहण महत्वाचं असेल...

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com