जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर दगडफेक करण्यात आली आहे. ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास ही दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
मात्र, या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, या दगडफेकीचा थरारक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले असून ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत. त्याचवेळी ट्रेनमधील प्रवासी आरडाओरड करीत आहेत.
ट्रेन अत्यंत संथ गतीने गतीने पुढे जात आहेत. प्रवासी महिला आरडाओरड करताना दिसून येत आहेत. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (Bhusawal Nandurbar Passenger) ट्रेनमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. सर्वसामान्यांचं वाहतुकीचं साधन म्हणून या ट्रेनची ओळख आहे. पण काही दिवसांपासून ही ट्रेन खूपच लेट होत आहेत.
वारंवार थांबे घेत असल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याच कारणातून ही दगडफेक झाली असावी, असा प्राथामिक अंदाज व्यक्त केला जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ट्रेनची साखळी खेचून ही दगडफेक करण्यात आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.