महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मौसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण जून महिन्यात पावसाने राज्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिना सुरू होताच अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसाने (Heavy Rain) नदी नाले तुडूंब झाले. त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीची कामे आटोपून घेतली.
दरम्यान मागील आठवड्यात राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सध्या मुंबईसह उपनगर, कोकण किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान येत्या ५ दिवसांत पावसाचा जोर (Rain Alert) आणखीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण जाले आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस महाराष्ट्रात दाखल होत आहे.
परिणामी आजपासून पुढील ५ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरातही पाऊस चांगलाच जोर पकडण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.