Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

Satara News : साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल होऊन चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना घडली. निष्काळजीपणामुळे कुटुंबीयांचा संताप.
Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप
Satara NewsSaam Tv
Published On
Summary
  • साताऱ्यात सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

  • चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याची घटना

  • कुटुंबीयांचा संताप; पोलिसांची मध्यस्थी

  • रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

ओंकार कदम, प्रतिनिधी सातारा

साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस गाठला गेला. या रुग्णालयात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाला. या मृतांचे मृतदेह नातेवाईकांजवळ देताना आदलाबदली झाल्याचे समोर आले. रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे मृत्यूनंतरही माणसाच्या वेदना संपत नाहीत असाच आता म्हणावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील २६ वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील ५१ वर्षीय सुरेश खोमणे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण त्यानंतर जे घडलं, ते अक्षरशः सातारा जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारे आहे.

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप
Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले.चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि मग पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली.

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप
Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून, रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला.या आधी साधारण महिनाभरा पूर्वी सुद्धा अशीच चूक जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासन कडून झालेली होती. त्यामुळेच आता जिल्हा रुग्णालयाच्या एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे “मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळणार नाही का ? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com