SSC-HSC Result 2026: दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख आली समोर

Maharashtra Board Result 2026: दहावी- बारावीचा निकाल लवकरच लागू शकतो. मे महिन्यात दहावी आणि बारावीचा दोन्ही निकाल लागण्याची शक्यता आहे.
SSC-HSC Result 2026
SSC-HSC Result 2026Saam Tv
Published On
Summary

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

या दिवशी निकाल लागण्याची शक्यता

लवकरच होणार घोषणा

दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन महिना उलटून गेला आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार, असा प्रश्न पडला आहे. दहावी-बारावीचा निकाल काय लागतो, किती टक्के मिळणार, याकडेच विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असते. दरम्यान, आता दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

SSC-HSC Result 2026
HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)) फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या कालावधीत बारावी आणि दहावीची परीक्षा घेतली होती. आता विद्यार्थी परीक्षेच्या निकालाकडे डोळे लावून आहेत.

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? (10th-12th Result Date Announcement)

१० फेब्रुवारी ते १८ मार्च कालावधीत बारावीची परीक्षा झाली होती. २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधी दहावीची परीक्षा झाली आहे. यानंतर आता बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल (Maharashtra Class 10th result 2026) लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

SSC-HSC Result 2026
SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाने घेतला मोठा निर्णय

बारावीच्या निकालाचे (Maharashtra board 12th result) काल अंतिम टप्प्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ लाखांपेक्षा जास्त उत्तरप्रक्रिया तपासणी प्रसोस पूर्ण झाली आहे. सध्या त्याच्या रिपोर्टिंगचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसात १२वीचा निकाल लागू शकतो.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या (SSC Result) उत्तरपत्रिकांचीही तपासणी वेगात सुरु आहे. अनेक प्रश्नपत्रिका तपासल्या गेल्या आहेत. त्यानंतर काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि मे महिन्याच्या तिसऱ्या- चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागू शकतो.

SSC-HSC Result 2026
SSC Result 2026: दहावीचा निकाल कसा पाहायचा? या वेबसाइट आताच नोट करा

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com