SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाने घेतला मोठा निर्णय

SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळणार आहे.
SSC news
SSC and HSC Saam tv
Published On
Summary

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच वेळी मिळणार

क्यूआर कोड स्कॅनद्वारे बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट ओळखता येणार

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दहावीची मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी मिळणार आहे.

दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड देखील असणार आहे. या क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती सहज मिळणार आहे. यामुळे बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्वरित ओळखता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दिली जायची. त्यानंतर सुमारने सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जायचे. मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये फोटो आणि क्युआर कोड स्कॅन करण्याची सुविधा नव्हती.

SSC news
Periodic Assessment Test: राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या 3 मूल्यांकन चाचण्या होणार, कसं असेल वेळापत्रक?

खरंतर बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला होता. यंदा बारावीचा निकाल आधी लागेल. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

बोगस मार्कशीट त्वरित ओळखता येणार

मागील काही वर्षांपासून बोगस मार्कशीटचे प्रकरण समोर येत होते. खरंतर बोगस मार्कशीट ओळखण्यात फार उशीर लागत होता. आता क्यूआर कोडच्या मदतीने काही सेकंदात निकालाची सत्यता पडताळता येणार आहे.

SSC news
Maharashtra Live News Update: गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

नव्या मार्कशीटवर आधारकार्डानुसार विद्यार्थ्याचे नाव असणार आहे. याआधी विद्यार्थ्याचे आडनाव आधी असायचे. त्यानंतर विद्यार्थी आणि त्याच्या वडिलाचे नाव असायचे. फोटो आणि क्यूआर कोडमुळे मार्कशीट फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com