Solapur News: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; वसंत मोरेंनंतर धाराशिवमधील बड्या नेत्यानं सोडली साथ

Bhausaheb Andhalkar leaving Vanchit Bahujan Aghadi: वंचितला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. धाराशिवमधील बड्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडल्याचं समोर आलंय.
Prakash Ambedkar:  मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर आम्हाला सत्ता द्या, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Prakash AmbedkarSaam TV
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली होती, त्यानंतर आता धाराशिवमधील बड्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे. धाराशिव लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांची वंचितला सोडचिठ्ठी दिलीय.

बड्या नेत्याची वंचितला सोडचिठ्ठी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांचे गाळप सत्र सुरू झालंय. प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही. त्यामुळे वंचितच्या लोकसभा उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी (Solapur News) पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. आंबेडकरांची मराठा आरक्षणावरील मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का

धाराशिव लोकसभेचे वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितला रामराम ठोकल्याचं समोर आलंय. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाऊसाहेब आंधळकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. याचा मोठा फटका आता वंचित बहुजन आघाडीला बसल्याचं दिसत (Maharashtra Politics) आहे.

Prakash Ambedkar:  मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर आम्हाला सत्ता द्या, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Vanchit Bahujan Aghadi: नगर 'वंचित'मध्ये उभी फूट? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दाेन्ही गट आमने-सामने; मावळात जाेशींचा अर्ज दाखल

मराठा समाजाबाबतची भूमिका

भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी वंचितकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली (Bhausaheb Andhalkar leaving Vanchit Bahujan Aghadi) होती. भाऊसाहेब आंधळकर यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केलाय. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहिम काढली, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला, त्यामुळे मी व्यथित झालोय. याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत असल्याचं आंधळकर यांनी स्पष्ट केलंय.

Prakash Ambedkar:  मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर आम्हाला सत्ता द्या, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Vanchit Bahujan Aghadi : काळ आला हाेता पण...,गाेळीबारानंतरही वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी वाचला (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com