स्मार्ट मीटर बसवला नाही, तर वीज कापणार का? महावितरणकडून स्पष्टीकरण

smart meter news : राज्यातील विविध भागात स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला जात आहे. यानंतर महावितरणकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Mahavitaran smart meter
Mahavitaran news Saam tv
Published On
Summary

स्मार्ट मीटरच्या विरोधात वातावरण तापलं

स्मार्ट मीटरविषयी संभ्रम वाढल्यानंतर महावितरणकडून स्पष्टीकरण

महावितरणकडून नागरिकांना स्मार्ट मीटर बसवण्याचं आवाहन

राज्यभरात स्मार्ट मीटरच्या विरोधाच रान पेटलं आहे. महावितरणने पुढील ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवणार असल्याचे दावा केला आहे. दुसरीकडे स्मार्ट मीटरला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. राज्यातील विविध भागात स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन केलं जात आहे. स्मार्ट मीटरला विरोध वाढल्यानंतर महावितरणने स्पष्टीकरण दिलं आहे.

मागील दोन दिवसांपासून नागरिकांना महावितरणकडून ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवले जाणार असल्याचे मेसेज पाठवण्यात येत आहेत. परंतु या स्मार्ट मीटरविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. हाच मुद्दा विरोधी पक्षांनी उचलला आहे.

Mahavitaran smart meter
वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

विरोधी पक्षांकडून ठिकठिकाणी स्मार्ट विरोधात आंदोलन केली जात आहेत. बदलापुरात दोन सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. तर अंबरनाथमध्ये मनसे नेत्यांनी गळ्यात स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलांचे फोटो घालून महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला.

महावितरण कार्यालयांच्या बाहेर स्मार्ट मीटर आणि टीव्ही फोडून आंदोलन केले जात आहेत. नागरिकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. मीटर बसवण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोपानंतर महावितरणकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Mahavitaran smart meter
‘महावितरणची मनमानी कदापी सहन करणार नाही’; स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट

स्मार्ट मीटरवरून संभ्रम पसरल्यानंतर जुनं मीटर ४८ तासांत न बदलल्यास वीजप्रवाह रोखण्याचा दावा महावितरणने फेटाळून लावला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय अहिरे यांनी सांगितलं की, 'स्मार्ट मीटरमध्ये अचूक बिल येईल. घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटरमध्ये आताच्या दराच्या तुलनेत ८५ पैशांनी सवलत मिळणार आहे. या मीटरचे कोणतेही चार्जेस लागणार नाही. सध्या ग्राहकांना विनंती आहे की, वीज बिल अचूक येण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com