वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

mahavitaran smart meter : वीज मीटर ४८ तासांत बदलणार असल्याचा मेसेज महावितरणकडून ग्राहकांना पाठवला जात आहे. महावितरणने ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे सूचित केलं आहे.
mahavitaran news
mahavitaran smart meter Saam tv
Published On
Summary

नवी मुंबई, पनवेल भागात वाढले वीज खंडित होण्याचे प्रकार

महावितरणच्या कारभाराविरोधात ग्राहकांचा संताप

दुसरीकडे महावितरणकडून 48 तासांत स्मार्ट मीटर बसवणार असल्याचा मेसेज

राज्यात उन्हाळ्यात वीजेचा वापर वाढला आहे. नवी मुंबई, पनवेल भागात वीज खंडित होण्याचेही प्रकार वाढले आहेत. वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयातही आंदोलन केलं आहे. 'महवितरण'च्या कारभाराविरोधात ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मात्र 'महावितरण'ने 48 तासांत स्मार्ट मीटर बदलण्याचा मेसेज ग्राहकांना पाठवला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

महावितरणने प्रत्येक ग्राहकांना वीज मीटर बदलणार असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरूवात केली आहे. तुमच्याकडे स्मार्ट मीटर नसेल, तर ४८ तासांत सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. मीटर बदलण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

mahavitaran news
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात कुठेही बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही महावितरणने ग्राहकांना मेसेज पाठवून मीटर बदलणार असल्याचे सांगितले आहे.

meter news
meter Saam tv

'महावितरणने व्हाट्सअॅपवर काय मेसेज पाठवला?

महवितरणाचा मेसेज जसाचा तसा

प्रिय उपभोक्ता,

भारत सरकारने दि.१७.०८.२०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर 'स्मार्ट मीटर' नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी 'स्मार्ट मीटर' बसविण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी की, हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे. स्मार्ट मीटरचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

१) यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते.

२) मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या विजेचा वापर आणि बिल यांवर लक्ष ठेवू शकता व ते नियंत्रित करू शकता.

३) घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत (Solar Hours) प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल.

mahavitaran news
Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

४) मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आपणास सहकार्य करण्याची आणि या सुविधेचा लाभ घेण्याची नम्र विनंती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com