SIR 2026 : SIR प्रक्रिया संपली! २४ ऑगस्टला यादीत नाव नसेल तर? अशी करा पुढची प्रक्रिया

SIR 2026 Update News : महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया पूर्ण झाली असून २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीत नाव नसेल तर २३ सप्टेंबरपर्यंत दावा किंवा हरकत कशी दाखल करायची, जाणून घ्या.
Maharashtra SIR Process 2026
Maharashtra SIR Process 2026AI Image
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली

  • २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

  • प्रारूप यादीत नाव नसेल तरी मतदारांना घाबरण्याची गरज नाही

  • मतदार यादीतील चुकीच्या नोंदींबाबतही या कालावधीत हरकत नोंदवण्याची संधी मिळणार

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची म्हणजेच SIR प्रक्रिया अखेर काल म्हणजेच सोमवारी पूर्ण झाली. मतदारांकडून जमा करण्यात आलेल्या गणना अर्जांच्या डिजिटायझेशनची मुदतही सोमवारी संपली. त्यामुळे आता २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या यादीत कोणाची नावे कायम राहतात आणि कोणाची नावे वगळली जातात, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र जर तुमचं नाव यादीत आढळलं नाही तर काय कराल? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

२४ ऑगस्टला नाव नसेल तर काय करायचं?

२४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचं नाव त्यात दिसत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने मतदारांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी दिली आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत संबंधित मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करता येणार आहे. तसेच मतदार यादीतील चुकीच्या नोंदींबाबत हरकतही नोंदवता येईल.

Maharashtra SIR Process 2026
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

त्यानंतर निवडणूक यंत्रणेकडून प्राप्त दावे-हरकतींची छाननी केली जाईल. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे २४ ऑगस्टच्या प्रारूप यादीत नाव नसले तरी प्रक्रिया तिथेच संपत नाही. मतदारांनी आपले नाव तपासून पाहावे आणि नाव नसेल किंवा नोंदीत काही त्रुटी आढळल्यास दिलेल्या मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी.

Maharashtra SIR Process 2026
Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

कोणत्या शहरात किती टक्के नोंदणी झाली?

सोमवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ गणना अर्ज अद्याप गोळा झाले नसल्याचे समोर आले. ठाणे जिल्ह्यात ६०.९२ टक्के, मुंबई शहरात ६२.३८ टक्के, मुंबई उपनगरात ६५.५० टक्के, तर पुण्यात ६७.९५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. दुसरीकडे बुलढाणा, हिंगोली, उस्मानाबाद, गोंदिया, बीड, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये डिजिटायझेशनची टक्केवारी ८४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com