शोले' स्टाईल ड्रामा! प्रेयसीच्या होकारासाठी तरुण चढला थेट मोबाईल टॉवरवर

Youth Climbs Mobile Tower For Girlfriend Acceptance In Sangli: सांगलीतील कुपवाडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून प्रेयसीच्या होकारासाठी हट्ट धरल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी समजूत काढून त्याला खाली उतरवले.
Sangli Kupwad youth climbs mobile tower in filmy ‘Sholay style’ demanding girlfriend’s approval, rescued by police
Sangli Kupwad youth climbs mobile tower in filmy ‘Sholay style’ demanding girlfriend’s approval, rescued by policesaam tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: चित्रपटामधील शोले स्टाईलने प्रेमाची कबुली देण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. असाच एक सिनेमटीक ड्रामा सांगलीतील कुपवाड शहरात घडला आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून प्रेयसीच्या होकारासाठी ठिय्या मांडल्याची धक्कादायक आणि तितकीच चर्चेची घटना समोर आली आहे.

Sangli Kupwad youth climbs mobile tower in filmy ‘Sholay style’ demanding girlfriend’s approval, rescued by police
Pune : पुण्यात लव्ह ट्रँगलचा थरार! संतप्त प्रियकराने थेट हिंजवडी गाठून एक्सच्या नव्या पार्टनरला संपवलं, तरुणीही गंभीर

कुपवाड शहरात अचानक एका मोबाईल टॉवरवरून एका तरुणाच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आसपासच्या नागरिकांनी वर पाहिले असता एक तरुण टॉवरच्या टोकावर जाऊन बसल्याचे निदर्शनास आले. “जोपर्यंत माझी प्रेयसी येत नाही आणि प्रेमाचा होकार देत नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही,” अशी भूमिका या प्रेमवीराने घेतली होती.

Sangli Kupwad youth climbs mobile tower in filmy ‘Sholay style’ demanding girlfriend’s approval, rescued by police
रेल्वे स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तरुणाने घातले थेट लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

एकतर्फी प्रेमातून एका प्रियकराने थेट मोबाईल टॉवरवर चढवून प्रेमाच्या होकारासाठी शोले स्टाईल प्रकार केल्याचं प्रकार घडला आहे. सांगलीच्या कुपवाडमध्ये हा सिने स्टाईल शोले प्रकार घडला. मुलीचा होकार मिळवण्यासाठी प्रेम वेड्या तरुणाने शहरातल्या एका मोबाईल टॉवरवर चढला. त्यानंतर टॉवरवर चढून जोरजोराने ओरडण्याचा प्रकार सुरू झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांच्या सदर बाब लक्षात आली आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Sangli Kupwad youth climbs mobile tower in filmy ‘Sholay style’ demanding girlfriend’s approval, rescued by police
Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

जोपर्यंत प्रेयसी येत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेत सुमारे तासभर हा प्रेमवीर टॉवरवर बसून होता. या प्रकारामुळे या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. दरम्यान कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तरुणाशी संवाद साधत त्याची समजूत काढली. त्यानंतर तरुण खाली उतरला आणि पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र प्रेमवीराच्या शोले स्टाईल प्रकाराने प्रशासनाची चांगलीचं तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com