Windmill Viral Video: बापरे! महाकाय पवनचक्की पत्त्याच्या घरासारखी कोसळली, थरारक घटनेचा व्हिडिओ आला समोर

Beed Windmill Collapsed Video: बीडमधील गेवराई परिसरात पवनचक्की पडल्याची घटना घडली आहे. अचानक पवनचक्की पडल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
windmill viral video
windmill viral videoSaam Tv

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात एक पवनचक्की कोसळली आहे. पालख्या डोंगरावर ही घटना घडली आहे. डोंगरावरची पवनचक्की अचानक कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडच्या डोंगरावरील पवनचक्की पडली त्यात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्या वेळी पवनचक्की पडली त्यावेळी त्या डोंगराच्या परिसरात कोणीच नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पवनचक्की कोसळतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शुट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीडमधील गेवराई तालुक्यातील डोंगराळ परिसरात खाजगी कंपन्यानी अनेक पवनचक्क्या उभारल्या आहेत. त्यातीलच एक पवनचक्की अचानक जमिनीवर कोसळली. पवनचक्कीच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे समोर आले आहे. पवनचक्कीची व्यवस्थित काळजी न घेतल्याने, वेळेवर सुधारणा केल्याने ही दुर्घटना घडल्याने सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. इतर पवनचक्की उत्तम अवस्थेत असतील की नाही याबाबत गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर पवनचक्की मजबुत आहेत की नाही याबाबत तपासणी करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

windmill viral video
Gadchiroli : गडचिरोलीत चकमक, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावले, बाॅम्ब केले निकामी

पवनचक्की पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात पवनचक्की अर्ध्यातून तुटून खाली पडल्याचे दिसत आहे. पवनचक्कीचे पाते खाली तुटून पडले आहेत. हे पाते सर्वत्र विखुरले गेले आहेत.

windmill viral video
Udayanraje Bhosale News: छत्रपती उदयनराजेंच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार? आज रात्रीच दिल्लीला रवाना होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com