Viral Video
Shocking VideoSaam Tv

Shocking Video: अरे बापरे! मिठाईमध्ये निघाल्या चक्क अळ्या, चिखली येथील स्वीटमार्टमधील प्रकार; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पुन्हा एकदा मिठाईमधून जिंवत अळ्या निघत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

Worm in Sweet: आता सणासुदीचे दिवस सुरु आहे. जिकडेतीकडे मिठाईचे दुकानावर गर्दी दिसून येत आहे. दिसायला चमचमीत मिठाई ,मात्र त्यात जर अळ्या निघत असतील तर मग प्रश्न् उपस्थित होतो तो जीवाशी खेळण्याचा. चिखली येथील एका स्वीट मार्ट दुकानात एका ग्राहकाने मिठाई खरेदी केली त्यात चक्क अळ्या निघाल्या आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं तरी काय?

चिखली(chikhali) येथील एका व्यक्तीने एका मिठाईच्या दुकानातून मिठाई(Sweet) विकत घेतली. त्यानंतर त्या मिठाईतून ग्राहकाला अळ्या निघत असल्याचे समजताच ग्राहक दुकानात पोहचला. त्यानंतर ग्राहकाने तातडीने दुकान मालकाला ती मिठाई दाखविण्यात आली आणि जाब विचारला तेव्हा त्या मालकाने,''ये तो होता रहता है, कुछ नही होता ...''असं उडवा उडविच उत्तर दिल.

ग्राहकाने त्यानंतर तातडीने अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्याला फोन करून माहिती दिली. अधिकारी दुकानात पोहोचले आणि त्यांनी त्या सर्व मिठाईचे सॅम्पल घेतले आणि तपासणीसाठी घेऊन गेले. अद्याप कारवाई कुठलीही केली नाही. एवढेच नाही तर साधी नोटीस सुद्धा त्या दुकानदाराला दिली नाही, अशी कारवाई होत नसेल तर हे प्रकार वाढणारच अशी ग्राहकांची प्रतिक्रिया होती.

आणखी एक प्रकरण समोर आले

चिखलीमधील मिठाईतून अळ्या निघाल्याची घटना ताजी असताना कालही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत होता. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली एका मिठाईच्या दुकानातील होता. तिथेही एका मिठाईच्या दुकानात असलेल्या मिठाईवर जिंवत उंदीर फिरत असल्याचे आढळून आले होते. सर्व व्हिडिओ एका ग्राहकाने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केला होतो. सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Shocking Video : शाळेत वर्ग सुरु असताना अचानक कोसळली भिंत ! संपूर्ण घटना CCTVत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com