धक्कादायक : चंद्रपुरात विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार!
धक्कादायक : चंद्रपुरात विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार! SaamTvNews

धक्कादायक : चंद्रपुरात विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार!

पतीपासून विभक्त झालेल्या एका विवाहित महिलेला त्याने जाळ्यात ओढले. तिच्या असहायतेचा लाभ उचलत तिचे वारंवार शोषण केले.
Published on

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एका पोलीस शिपायानेच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसनेच हे घृणीत कृत्य केल्याने विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झालाय. लालश्याम बाबूराव मेश्राम (५१) असे या पोलिसाचे (Police) नाव असून तो सध्या पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.

हे देखील पहा :

वर्षभरापूर्वी तो ब्रह्मपुरी (Brahmpuri) पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा ब्रम्हपुरी येथील टिळक नगरात पतीपासून विभक्त झालेल्या एका विवाहित महिलेला त्याने जाळ्यात ओढले. तिच्या असहायतेचा लाभ उचलत तिचे वारंवार शोषण (Rape) केले. अत्याचाराचे आक्षेपार्ह फोटोज (Photo) आणि मेसेज अत्याचारग्रस्त महिलेला पाठवत तिला मर्जीप्रमाणे वागवत होता.

धक्कादायक : चंद्रपुरात विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार!
Nagpur : कर्जबारीपणामुळे संपवलं कुटुंब; बायकोसह दोन मुलांची हत्या केली स्वतःही गळफास घेतला!

शेवटी त्याच्या जाचाला कंटाळून या महिलेने (Woman) आज ब्रम्हपुरी पोलिसात दिली. तक्रारीनुसार लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र या कृत्याने पोलीस विभागाची मोठी बदनामी होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com