Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले

Nagpur Youth End Life: नागपूरमध्ये एका तरुणाने गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत आयुष्य संपवलं. या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.
Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले
Nagpur Youth End LifeSaam Tv
Published On
  • नागपूरमध्ये तरुणाची आत्महत्या

  • गर्लफ्रेंडसोबत भांडणानंतर आत्महत्या

  • व्हिडीओ कॉल करत तरुणाने संपवलं आयुष्य

  • लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूरमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडसोबत झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ही घटना समोर आली. गर्लफ्रेंडसोबत वाद झाल्यानंतर ती बोलत नसल्यामुळे तरुण तणावात होता. याच तणावातून त्याने गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत आयुष्य संपवले. राहत्या घरी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष अमर वामन असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो दानागंड येथील स्वीपर कॉलनीमध्ये राहत होता. आयुष नागपूर रेल्वे स्थानकावर हाऊसकिपिंगचे काम करत होता. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे आयुष मानसिक तणावाखाली गेला होता. या तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले
Nagpur : नागपुरात ACBची मोठी कारवाई! बड्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा अडकला जाळ्यात

आयुषने सोमवारी सकाळी गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला. तिच्यासोबत बोलताना त्याने मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने स्कार्फच्या सहाय्याने गळफास तयार करत असल्याचे तिला दाखवले. यावेळी आयुषला त्याच्या गर्लफ्रेंडने समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचे काही ऐकले नाही. त्याने घरातील पंख्याला गळफास घेत आयुष्य संपवलं.

Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले
Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयुषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्याचा मोबाइल जप्त करून पोलिसांनी तपासणीसाठी दिला. पण आत्महत्या करण्यापूर्वी आयुषने आपल्या मोबाइलमधील काही चॅट्स डिलीट केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिस आयुषच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहे.

Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले
Nagpur Police: सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह ९ जणांचे निलंबन; पोलीस दलात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com