Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra Heatstroke Update: महाराष्ट्रात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील उष्माघाताच्या रुग्णामध्ये वाढ होत चालली आहे. नागपूरमध्ये उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nagpur Heatstroke : महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?
Maharashtra HeatstrokeSaam Tv
Published On

Summary -

  • महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट

  • नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय

  • विदर्भात तापमान 45 अंशांच्या पुढे

  • नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

गिरीश निकम, साम टीव्ही

महाराष्ट्रात उष्माघाताची तीव्र लाट आहे. उपराजधानी नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. वाढत्या तापमानामुळे पशूधनही धोक्यात आलं आहे. पाहूया एक रिपोर्ट....

उन्हाचा पारा 40 अंशांच्यावर गेल्याने मुंबईसह महाराष्ट्र तापला आहे. विदर्भात तर उष्माघाताने कहर केलाय. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 45 अंशांच्यावर तापमान गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. प्रखर उन लोकांच्या जीवावर बेततंय. दुपारच्यावेळी रस्ते निर्मनुष्य होतायेत.

Nagpur Heatstroke : महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?
Summer heat children: उन्हाचा तडाखा वाढला! मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

उष्माघाताचे रुग्ण -

- अकोल्यात उष्माघाताचे सर्वाधिक 72 रुग्ण आहेत.

- नागपूरमध्ये उष्माघाताचे 18 रुग्ण आहेत.

- छत्रपती संभाजीनगरात 15 रुग्णांची नोंद झाली.

- नंदूरबारमध्ये 7 रुग्ण उपचार घेत आहेत.

कुठल्या जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू झालाय?

नागपूर - 3

लातूर : 3

अहिल्यानगर- 2

हिंगोली: 2

परभणी : 2

Nagpur Heatstroke : महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?
Wardha Heat Wave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अंगणवाडी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी

उन्हापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल?

- सतत पाणी, ताक किंवा लिंबू सरबत घेऊन शरीर हायड्रेटेड ठेवा

- चहा, कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन टाळा

- दुपारी 12 ते 4 या प्रखर उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळा

- बाहेर पडताना फिकट रंगाचे, सैल सुती कपडे, टोपी आणि छत्रीचा वापर करा

- आहारात कलिंगड, काकडी यांसारखी पाणीदार फळं घ्या

- जास्त मसालेदार, तेलकट आणि शिळं अन्न खाणे टाळा

- चक्कर, मळमळ किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

Nagpur Heatstroke : महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?
Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे पशूधनही संकटात सापडलंय. लातूरच्या निलंगा तालुक्यात 43 अंश तापमानामुळे बैलजोडी दगावली आहे. धाराशिव जिल्ह्यात पारा 41 अंशांच्या पार गेलाय. पाणवठे कोरडे पडल्याने येडशीमधील रामलिंग अभयारण्यातील वन्यजीवांचे हाल होतायंत. जागतिक हवामान संघटनेने एल निनो परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वेगाने वाढत असून एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. परीणामी भारतातही उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मात्र हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्याने संपूर्ण मे महिना आरोग्याची काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.

Nagpur Heatstroke : महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?
Maharashtra heatwave : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com