

रोहित कदम, साम प्रतिनिधी
राज्यात उष्णतेचा पारा चढला असून एप्रिलच्या मध्यावरच कोकणपासून विदर्भापर्यंत तापमानात मोठी वाढ झालीये. पुण्यात 39 अंश तर अकोल्यात यंदाच्या हंगामातील देशातील सर्वाधिक उच्चांकी 43.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. इतकंच नाही तर राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
- अमरावती
- सांगली
- सोलापूर
- छ. संभाजीनगर
- जालना
- परभणी
उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दीड महिन्यात उष्माघाताचे 750 रुग्ण नोदवले गेले होते.त्यामुळे राज्यातील प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. पारा 40 अंशांच्या पार पोहोचल्यानं पुण्यातही उष्माघाताचा धोका वाढलाय. राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगामी काळात फळबाग आणि पिकांवर होणारा परिणाम यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावले आहेत. तसंच, राज्यात विजेची मागणीदेखील वाढण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान SOP जाहीर केलीय. या उष्णतेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.