Nagpur Police: सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह ९ जणांचे निलंबन; पोलीस दलात खळबळ

Cyber Police Inspector Among 9 Officers Suspended : नागपूर सायबर पोलीस ठाण्यात एका पोलीस निरीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Cyber Police Inspector Among 9 Officers  Suspended
Nagpur police suspend 9 cyber police personnel after misconduct allegations surface.saam tv
Published On
Summary
  • सायबर पोलीस ठाण्यातील गैर प्रकाराचा मुद्दा चव्हाट्यावर

  • एकाच वेळी ९ जणांवर निलंबनाची कारवाई

  • नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई केली

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर सायबर पोलीस ठाण्यात एकाच वेळी 9 जणांवर निलंबनाच्या कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह नऊ जणांचे निलंबन करण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यातील गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर आता उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे सोपवली आहे.

Cyber Police Inspector Among 9 Officers  Suspended
मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा; नसरापूर प्रकरणानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर

तपास सोडून परस्परांच्या कामात हस्तक्षेप करत सहकाऱ्यांना हाणामारी केल्याचा प्रकार चव्हाट्यावर येताच ठाणेदार बळीराम सुतार आणि योगेश घारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणेंसह ६ हवालदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर दक्षिण विभाग सायबर ठाण्याची जबाबदारी सुरेश डंभारे यांच्यावर, तर उत्तर सायबर ठाण्याची जबाबदारी सुधीर बोरकुटे यांच्यावर सोपवण्यात आली.

Cyber Police Inspector Among 9 Officers  Suspended
Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

हाती आलेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्यातील गैरकारभाराची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून प्रशासन विभागाचे पोलीस उपायुक्त अग्रवाल यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून पुढील आदेशापर्यंत ९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित झालेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुतार (दक्षिण) आणि घारे (उत्तर) यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, हवालदार सौरभ हिवरकर, श्रीकांत गणोकर, सुनील चनगोले, सतीश वाघ, अजय पवार, प्रफुल्ल ठाकरे यांचा समावेश आहे.

का झाली कारवाई?

हिरेन भोजवानी यांच्या तक्रारीमुळे सायबर पोलीस ठाण्यातील अंतर्गत वादाला तोंड फुटले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर ठाण्यातील पथक तपासासाठी पुणे येथे गेले. त्या ठिकाणी १४ जणांना ताब्यात घेत चौकशी केली. यातून क्रिकेट सट्टा बेटींगचे जाळे समोर आले. एकांश नावाच्या बुकीने वेगवेगळ्या ४० हून अधिक बँक खात्यांमधून हवालाचे २५० कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार केले आहे ही उघड झाली. तरीही पथकाने केवळ सूचनापत्रावर त्याला सोडून दिले. त्यानंतर एकांश फरार झाला. हा प्रकार कळताच दुसऱ्या गटातील सायबर अधिकाऱ्यांनी याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल केली. त्यावरून अंतर्गत वादाचा भडका उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com