Marriage Pressure Turns Fatal: बुलढाण्यात धक्कादायक घटना; लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Marriage pressure India: बुलढाण्यातील २२ वर्षीय तरुणाने लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढता मानसिक ताण आणि समाजाचा दबाव तरुणांसाठी किती घातक ठरतो, हे या घटनेतून स्पष्ट होते.
Lifestyle
Depression ThoughtsSaam Tv
Published On

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात एक अतिशय दु:खद घटना घडलीये. माकनेर शिवारात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. केशव बाबुराव वनारे असं या तरुणाचं नाव असून, तो काही दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार प्रयत्न करूनही त्याचं लग्न जुळत नव्हतं. लग्न होत नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

Lifestyle
Crime news: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला; फ्लॅटचे दार तोडून पोलीस आत घुसताच उडाली खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, केशव हा स्वभावाने शांत आणि कुटुंबाशी जोडलेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून तो खूप चिंतेत दिसत होता. लग्न जुळत नसल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला होता. या मानसिक अवस्थेत त्याने टोकाचा निर्णय घेतला. दारूच्या नशेत त्याने शेतातील विहिरीत उडी घेतली. ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Lifestyle
Crime News: धक्कादायक! लग्नाचं आमिष देऊन बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची तरूणाची धमकी

या घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Lifestyle
Baramati crime news: जबरदस्ती वाहनामध्ये कोंबलं, बेदम मारहाण केली आणि...; कारण ठरली बायको, तरुणासोबत भयंकर घडलं?

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतेय. तरुण वयात अशा प्रकारे आयुष्य संपवण्याची वेळ येणं ही खूप चिंतेची बाब असल्याचं म्हणणं आहे. आजकाल तरुणांमध्ये वाढत चाललेला मानसिक तणाव, अपेक्षांचं ओझं आणि अपयश सहन न होणं हे मोठं कारण ठरत असल्याचंही काहींनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com