Crime News: धक्कादायक! लग्नाचं आमिष देऊन बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची तरूणाची धमकी

Ajmer police case: एका महिलेने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. पोलीसांनी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून प्रकरण गंभीर मानलं जात आहे.
Ajmer police case
Ajmer police caseSaam Tv
Published On

अजमेरमधून एक धक्कादायक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार घडलाय. इतकंच नाही तर महिलेने तरूणावर अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही मुलावर लावलाय. राजस्थानच्या अल्वर गेट पोलीस स्थानकात या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या महिलेने रिपोर्टमध्ये सांगितलंय की, तिचा विवाह २००७ मध्ये झाला होता. मात्र २०११ मध्ये तिने तलाक घेतला. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. यावेळी तिची अजमेरमध्ये एका मुलाशी ओळख झाली.

Ajmer police case
Crime news: मस्करी ठरली जीवघेणी! मित्राच्या गुप्तांगात भरली कंप्रेसरने हवा; पोट फुटून बाहेर आली आतडी, तरूणाचा मृत्यू

लग्नाचं वचन देऊन ठेवले शारीरिक संबंध

या महिलेने आरोप लावलाय की, २०१७ मध्ये या तरूणाने तिला लग्न करण्याचं वचन दिलं. इतकंच नाही तर त्याने शपथ पत्रही बनवलं होतं. लग्नाचं वचन देऊन तरूणाने या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवले होते.

Ajmer police case
Crime news: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला; फ्लॅटचे दार तोडून पोलीस आत घुसताच उडाली खळबळ

जानेवारी २०२६ मध्ये पीडितेला समजलं की, त्या तरुणाने डिसेंबर २०२५ मध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केलंय. महिलेच्या सांगण्यानुसार, तो तरुण ८ फेब्रुवारी रोजी इंदूरला आला आणि त्याने सांगितलं की, त्याच्या आई-वडिलांनी हे लग्न जबरदस्तीने लावलंय. तो आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत राहणार आहे. मात्र, २७ मार्च रोजी त्याच्या पत्नीने त्या तरुणाने बनवलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर तिला आणि तिच्या मुलीला पाठवले.

Ajmer police case
Crime: घरात घुसून दिव्यांग महिलेवर बलात्कार, नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोची अवस्था पाहून हादरला

२६ एप्रिल रोजी, जेव्हा ती अजमेरमधील त्या तरुणाच्या घरी पोहोचली, तेव्हा त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यावेळी त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेची तक्रार मिळाल्यानंतर, कायद्याच्या कलम ६७-अ आणि आयटी एक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com