

संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या
महिलेने केली महिलेची हत्या
चाकूने वार आणि गोळ्या झाडत संपवलं
पोलिसांनी आरोपी महिलेला केली अटक
संभाजीनगरमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या बायकोची निर्घृण हत्या केली. बजाजनगरच्या साई श्रद्धा पार्कमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली. एका महिलेने घरात घुसून महिलेवर बॉयफ्रेंडच्या बायकोवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून सर्वांना हादरा बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या बाजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्कमध्ये सकाळी ही घटना घडली. एका महिलेने बॉयफ्रेंडच्या बायकोची हत्या केली. या महिलेने आधी बॉयफ्रेंडच्या बायकोच्या डोक्यावर बंदूक रोखली त्यानंतर तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला आणि शरिरावर चाकूने वार केले. साधना सोनपेठकर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव होते. तर महेंद्र सोनपेठकर असं या महिलेच्या नवऱ्याचे नाव आहे. साधना आणि महेंद्र हे वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये राहत होते. तर शैला सोनार असं आरोपी महिलेचे नाव आहे.
महेंद्र सोनपेठकर आणि शैला सोनार यांचे प्रेमसंबंध आहेत. यामुळे महेंद्र आणि त्याची बायको साधना यांच्यात वाद होत होते. या वादातूनच शैलाने साधना यांची हत्या केली. आरोपी महिला थेट साधना सोनपेठकर यांच्या घरात शिरली आणि त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. घटनास्थळी पिस्तूल देखील आढळून आली आहे. अत्यंत क्रूररित्या साधना यांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताचे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. साधना सोनपेटकर यांची हत्या का करण्यात आली यामागचे कारण समोर आले नाही.
झटापटीदरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी साधना यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि बंदुक जप्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.