'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, ते अर्धे पाकिस्तानी'; संजय राऊतांची जहरी टीका

Shiv Sena (Thackeray) Protests: संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान सामन्यावर अजित पवारांच्या विधानावर जोरदार टीका केली.
Sanjay Raut Slams Ajit Pawar
Sanjay Raut Slams Ajit PawarSaam
Published On
Summary
  • दुबईतील भारत-पाकिस्तान सामन्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला

  • अजित पवार म्हणाले – "खेळाकडे खेळाच्या नजरेनं पाहावं"

  • संजय राऊत म्हणाले – "अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहतंय"

  • राऊतांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवरही जोरदार हल्ला चढवला

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली. नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. अजूनही पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीयांच्या मनात आग धगधगत आहे. आज दुबईत भारत पाकिस्तानची मॅच रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर या सामन्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरणार आहे. आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भारत- पाकिस्तान सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर जहरी टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

भारत पाकिस्तान सामन्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'खेळाकडे खेळाच्या नजरेनं बघावे की नाही, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिला आहे. सत्ताधारींच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी विरोधक निमित्त पाहत असतात. या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये. असे माझे आवाहन आहे', असं अजित पवार म्हणाले.

Sanjay Raut Slams Ajit Pawar
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

अजित पवारांच्या विधानाचा संजय राऊतांनी समाचार घेतला. 'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहतंय. ते अर्धे पाकिस्तानी आहेत. राज्याचा मंत्री जर भारत -पाक सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर, ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही', असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Slams Ajit Pawar
नेपाळ, फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये उद्रेक, लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पोलिसांवर बाटल्या फेकल्या

'पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या २६ लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर, तुम्ही असं बोलले नसता', असंही संजय राऊत म्हणाले. अजित पवारांसह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकेची तोफ डागली. 'शिंदेंचा पक्ष हा पक्ष नसून, अमित शहांची छोटी कंपनी आहे. तात्पुरत्या स्वरूपात शेअर बाजारात टाकलेला हा माल आहे. देशाच्या भावना काय आहे, ही लोक बोलत काय आहेत', असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut Slams Ajit Pawar
आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com