नेपाळ, फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये उद्रेक, लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पोलिसांवर बाटल्या फेकल्या

Massive Anti-Immigration Rally: लंडनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी प्रचंड रॅलीदरम्यान पोलिस आणि आंदोलक आमनेसामने. एकूण २६ पोलीस अधिकारी जखमी झाले, त्यापैकी चार गंभीर जखमी आहेत.
Massive Anti-Immigration Rally
Massive Anti-Immigration RallySaam
Published On
Summary
  • लंडनमध्ये दीड लाख लोकांची स्थलांतरविरोधी प्रचंड रॅली

  • हिंसाचारात २६ पोलीस जखमी, २५ जण अटकेत

  • टॉमी रॉबिन्सन यांनी रॅलीचे नेतृत्व केले

  • एलोन मस्क यांनी व्हिडिओद्वारे भाषण देत सरकार बदलाची मागणी केली

युनायटेड किंगडमची राजधानी लंडनमध्ये स्थलांतराच्या विरोधात प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीत अंदाजे दीड लाख लोक सहभागी झाले होते. टॉमी रॉबिन्सन यांनी “युनायटेड द किंगडम” या नावाने ही रॅली आयोजित केली होती. मात्र, रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला. यात २६ पोलीस अधिकारी जखमी झाले असून, त्यापैकी चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच लोक शांततेत निषेध करण्यासाठी आले होते. परंतु असेही काही लोक होते, ज्यांचे उद्दीष्ट हिंसाचार पसरवणे होते. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २५ जणांना ताब्यात घेतलं आहे. आणखी लोकांची ओळख पटवली जात आहे, ज्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

Massive Anti-Immigration Rally
वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

या रॅलीमध्ये लाखो संख्येनं लोक सहभागी झाले होते. यात आंदोलकांनी युनियन जॅक आणि इंग्लंडचा ध्वज, तसेच अमेरिका आणि इस्त्रायलचे ध्वज रॅलीमध्ये आणले होते. तर, काही लोक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी MAGA टोपी घालून आले होते. निदर्शकांनी पंतप्रधानांवर टीका केली आणि स्थलांतरितांना घरी पाठवा, अशा घोषणा दिल्या.

Massive Anti-Immigration Rally
हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

रॅलीचा नेता टॉमी रॉबिन्सन नक्की कोण?

टॉमी रॉबिन्सन यांचे खरे नाव स्टीफन याक्सली लेनन आहे. ते इंग्लिश डिफेन्स लीगचे संस्थापक आहेत. ते ब्रिटनमधील उजव्या विजारसरणीच्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांनी सांगितले की, ही एका सांस्कृतिक क्रांतीची सुरूवात आहे.

यावेळी एलोन मस्क यांनी रॅलीमध्ये व्हिडिओद्वारे भाषण दिले. मस्क म्हणाले, ब्रिटमनमधील अनियंत्रित स्थलांतर देशाच्या अस्मितेला धोका निर्माण करत आहे. आता सरकार बदलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

Massive Anti-Immigration Rally
UPSC विद्यार्थ्याला लिंग बदलायची इच्छा, स्वत:च ब्लेडने गुप्तांग कापलं, भूल देऊन केली शस्त्रक्रिया

नेपाळ आणि फ्रान्समध्ये राजकीय गोंधळ

नेपाळ आणि फ्रान्समध्ये अलिकडेच मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ झाली. नेपाळमध्ये, बरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तरूण निदर्शक रस्त्यावर उतरले. तर, फ्रान्समध्ये आक्षेपार्ह कायदे आणि आर्थिक धोरणांविरूद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि रस्त्यावरील हिंसाचार झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com