
प्रयागराजमध्ये यूपीएससी विद्यार्थ्यानं स्वतःचा गुप्तांग कापला.
लहानपणापासून मुलगी व्हायची इच्छा असल्याने त्याने हे पाऊल उचलले.
घरमालकाने पाहताच त्याला रुग्णालयात दाखल केले.
सध्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.
प्रयागराजमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरूणानं स्वत:चा गुप्तांग कापला आहे. यानंतर तरूण वेदनेने तडफडू लागला. त्याला तातडीने रूग्णलयात नेण्यात आलं. यानंतर तरूणाला हे पाऊल उचलण्यामागील कारण विचारण्यात आले. ते कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला. सध्या तरूणावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
तरूणाचे वय जवळपास २२ - २३ असल्याची माहिती आहे. खरंतर त्या तरूणाला त्याचे लिंग बदलायचे होते. यासाठी त्यानं प्रथम स्वत:ला भूल देण्याचे इंजेक्शन दिले. नंतर सर्जिकल ब्लेडने गुप्तांग कापला. क्षणात तो खाली कोसळला. वेदनेने तडफडू लागला. घरमालकाने तरूणाला तडफडत असताना पाहिले. त्यांनी तातडीने तरूणाला रूग्णालयात नेले.
सध्या तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाला मुलगी व्हायचे होते. तरूणानं सांगितलं की, 'मला लहानपणीपासून मुलगी व्हायचे होते. वयाच्या १४ व्या वर्षी मुलगी असल्यासारखं वाटू लागलं. कुणीही माझं म्हणणं एकून घेत नव्हते. त्यामुळे मी हे पाऊल उचललं'.
हा तरूण अमेठी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो त्याच्या आई वडिलांचा एकूलता एक मुलगा आहे. यासंदर्भात तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भीतीपोटी काहीच सांगू शकला नाही. तो काही दिवस मावशीकडे राहत होता. नंतर तो प्रयागराजला शिक्षण घेण्यासाठी आला. तो तरूण यूपीएससी परिक्षेची तयारी करत होता.
तो शहरात भाड्याच्या घरात राहत होता. अभ्यासादरम्यान तो लिंग बदलाचे व्हिडिओ पाहायचा. यासंदर्भात त्या तरूणाने कटरा येथील एका बनावट डॉक्टर झेनिथशी संपर्क साधला. बनावट डॉक्टरनं दिलेल्या सल्ल्यानुसार, तरूणानं मेडिकल स्टोअरमधून भूल देण्याचं औषध आणि सर्जिकल ब्लेड घेतलं आणि गुप्तांग कापला, अशी माहिती तरूणाने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.