पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर

Rising Gold Rates Impact Consumers: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरवाढीचा मोठा फटका ग्राहकांना बसत असून, सराफांच्या दुकानांकडे ग्राहकांची पावलं वळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On
Summary
  • २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹७७१ ची वाढ

  • २२ कॅरेट सोनं १ तोळ्यासाठी ₹१,०२,००० वर पोहोचलं

  • १८ कॅरेट सोन्यातही ₹५८० ची वाढ नोंदली गेली

  • १ किलो चांदी ₹२,१०० ने वाढून ₹१,३२,००० झाली

सोन्याच्या दरात सातत्यानं चढ उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांत सणासुदीला सुरूवात होईल. सध्या पितृपक्ष सुरू आहे. अशातच सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात ७,७१० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. सोनं खरेदीकडे अनेकांचा कल असतो, मात्र दरवाढीमुळे सराफांच्या दुकानांकडे ग्राहकांची पावलं वळणार की नाही, याकडे सध्या सर्वांचेच लक्ष आहे.

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७७१ रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,११,२८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,७१० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,१२,८०० रूपये मोजावे लागतील. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

Gold Rate Today
गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेची मोठी कबुली, पोलिसांसमोर अखेर तोंड उघडलं, नेमकं काय म्हणाली?

तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०२,००० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,२०,००० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Today
मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घट

२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८३,४६० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,८०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८,३४,६०० रूपये मोजावे लागतील.

Gold Rate Today
बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात २,१०० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,३२,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com