मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घट

Liquor Price Hike: सोलापूर जिल्ह्यात दारू विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर झाली होती.
Liquor Price Hike
Liquor Price HikeSaam
Published On
Summary
  • सोलापुरात दारू विक्रीत लक्षणीय घट.

  • दारूच्या किमतीत वाढ.

  • ऑगस्ट महिन्यात केवळ ५ लाख ७४ हजार १ लिटर दारूची विक्री.

सोलापूर जिल्ह्यात दारू विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. दारूच्या किमतीत वाढ झाल्याकारणामुळे दारूच्या किमतीत बदल पाहायला मिळत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर दारूची विक्री झाली होती. मात्र, २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात केवळ ५ लाख ७४ हजार १ लिटर इतकी विक्री झाली आहे. दरम्यान, देशी दारू, वाईन आणि बिअरच्या विक्रीतही घट झाली आहे.

दरवाढीमुळे दारूच्या खपात घट

राज्य सरकारने यावर्षी देशी विदेशी दारूच्या दरात वाढ केली आहे. १८० एमएल देशी दारूची बाटली ८० रूपयांवर गेली आहे. तर, भारतीय बनावटीची दारू २५० रूपयांवरून थेट ३६० रूपयांना विकली जात आहे. म्हणजेच ११० रूपयांची वाढ झाली आहे. याशिवाय हॉटेल - रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू विक्रीवर १५ ते २० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे.

Liquor Price Hike
बायकोला इन्स्टा रिल्सचं वेड, नवऱ्याची सटकली; कुऱ्हाडीनं वार करत जागीच संपवलंं, लेकीलाही सोडलं नाही

या दरवाढीमुळे मद्यपींनी दारूचे व्यसन कमी केले आहे. याचा थेट परिणाम विक्रीवर झाला आहे. सोलापूर जिल्हात जुलै महिन्यात १३ हजार ७३४ लिटरने विक्री घटली होती. तर, जुलै - ऑगस्टदरम्यान, ही घट तब्बल ३ लाख ६६ हजार लिटरपर्यंत पोहोचली असल्याची माहिती आहे.

Liquor Price Hike
माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ३५० ते ४५० कोटींची दारू विक्री होत असते. मात्र, यंदा खप घटलेला असताना राज्य शासनाने देशी आणि विदेशी दारूच्या दरात वाढ केली आहे. तसेच विक्रीवरील अतिरिक्त शुल्कातही वाढ केली आहे. यामुळे १८० मिलिलिटर देशी - विदेशी दारूच्या बाटलीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तब्बल ८० ते १६० रूपयांपर्यंत वाढ केली आहे. याच कारणामुळे मद्यपींनी दारूच्या दुकानाकडे पाठ फिरवली आहे.

Liquor Price Hike
बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

गतवर्षी उत्पादन शुल्क विभागाला २६० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यावर्षी दर स्थिर असल्याकारणाने ३८५ कोटी रूपयांचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र, दारूच्या दरात वाढ झाल्याने विक्रीत घट झाली आहे. असे असतानाही दुप्पट उद्दिष्ट म्हणजेच ५१० कोटींच्या महसुलाचे टार्गेट दिले आहे. यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com