Bhavana Gawali: भावना गवळींना शह देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लान; हुकमी एक्का मैदानात उतरणार?

Uddhav Thackeray vs Bhavana Gawali: खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठा प्लान आखला आहे. ठाकरे सध्या जनसंवाद यात्रेवर असून येत्या १२ आणि १३ मार्च रोजी ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.
Uddhav Thackeray vs Bhavana Gawali
Uddhav Thackeray vs Bhavana GawaliSaam TV

Yavatmal-Washim Loksabha Election

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे वादळी सभा घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार तसेच खासदारांना पराभूत करण्याचा ठाकरेंनी चंगच बांधला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray vs Bhavana Gawali
Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाची दिल्लीत खलबतं; शिंदे-पवारांची अमित शहांसोबत चर्चा, काय निर्णय झाला?

अशातच खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा प्लान आखला आहे. ठाकरे सध्या जनसंवाद यात्रेवर असून येत्या १२ आणि १३ मार्च रोजी ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. (Latest Marathi News)

यादरम्यान राळेगांव आणि पुसदमध्ये ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार आहे. शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवताळमध्ये ठाकरेंच्या ४ वादळी सभा होणार आहेत. या सभेसाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

त्याचबरोबर या दौऱ्यात ठाकरे गटाकडून यवतमाळ-वाशिम लोकसभेचा उमेदवार देखील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. यासाठी ठाकरे गटाने माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.(Loksabha Election 2024)

संजय देशमुख हे दिग्रस मतदार संघातून आमदार राहिलेले आहेत. त्यांनी २००२ ते २००४ या काळात मंत्रीपद देखील भूषवलं होतं. काँग्रेसमध्ये असताना संजय देशमुख यांनी आता शिंदे गटात असणाऱ्या संजय राठोड यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सुरुवातीला ते संजय राठोड यांच्याविरोधात ते निवडणूक लढतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी दिग्रसच्या बाहेर पडून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. आता भावना गवळी यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

Uddhav Thackeray vs Bhavana Gawali
MNS Vardhapan Din: मनसेचा आज १८ वा वर्धापनदिन, राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार; लोकसभेचं रणशिंग फुंकणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com