MNS Vardhapan Din: मनसेचा आज १८ वा वर्धापनदिन, राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार; लोकसभेचं रणशिंग फुंकणार?

MNS Vardhapan Din 2024: मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

Raj Thackeray Speech On Vardhapan Din

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यंदा प्रथमच मनसेकडून वर्धापन दिन मुंबईबाहेर साजरा केला जाणार आहे. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray Latest News
Narendra Modi: PM मोदींकडून विकासकामांचा धडका; आज सेला बोगद्याचं उद्घाटन करणार, चीनला धडकी भरणार!

राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून जवळपास ५ हजार मनसैनिक तसेच पदाधिकारी दादासाहेब गायकवाड सभागृहात बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील वाटचाल आणि दिशा याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? याचा फैसला देखील आज होणार आहे. २०१४ पासून मनसेचा कायमच स्वबळावर लढण्याचा प्रयत्न राहिला आहे. मधल्या काळात राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. (Latest Marathi News)

त्यामुळे आज राज ठाकरे महायुतीत सामील होण्याबाबत काय निर्णय घेणार? याकडे देखील मनसैनिकांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरात शुक्रवारी (ता. ८) त्यांनी मनसैनिकांसह आरती केली.

यावेळी मनसैनिकांनी जय श्रीराम असा नारा दिला. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हिंदुत्वाच कार्ड बळकट करण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर हिंदू जननायक प्रतिमा अधिक प्रखर करण्याचाही मनसेचा प्रयत्न असेल. दरम्यान, राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करताना नेमकी कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Raj Thackeray Latest News
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com