मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा परिसरात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचीही भेट झाली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या भेटीगाठीनंतर भाजप आणि ठाकरे गटात जवळीक वाढल्याची तुफान चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगानं झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
राज्यातील राजकारणात कट्ट्रर विरोध ठरलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकमेकांसमोर आले. उद्धव ठाकरे-फडणवीस हे एकाच लिफ्टमधून सभागृहात गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे- फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आलंय.
ठाकरे गट आणि भाजपमधील वाढती जवळीक बघता राज्यातील राजकारणात परत उलटपालट होणार असल्याची शक्यता वर्तवलीय जातेय. आज सकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना चॉकलेट सुद्धा दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट पाहत अनेक कवयास लावले जात आहेत. परंतु या भेटीमधून कोणताच अर्थ काढू नये, असं भाजप नेते अतुल भातखळकर म्हणालेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि ठाकरे गटाची युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर टीका करणारे टीका झाले. यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळीही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर फडणवीस सुद्धा त्यांच्यावर टीका करत होते. लोकसभेच्यावेळी एकमेकांचे वैरी झालेले नेते आज आमनेसामने आलेत.
विधीमंडळाच्या सभागृहात जात असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. विधान भवनामध्ये फडणवीस आणि ठाकरे हे लिफ्टची वाट पाहत होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची भेटले आणि त्यांच्यात चर्चादेखील झाली. दरम्यान आज सकाळीच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत चॉकलेट देत केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली यामुळे त्यांच्या भेटीवरून वेगवेगळी अर्थ काढले जात आहेत.
एकाच लिफ्टमधून जात असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय. लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं .या विधानाचा अर्थ काय असा सवाल अनेकजण करत आहेत. तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय. या भेटीतून कोणता राजकीय अर्थ काढू नये, असं दरेकर म्हणालेत.
"आमची वैयक्तिक भांडणे नाहीत. राजकीय भांडण वेगळे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मतभेद असावेत मनभेद नाही," असे म्हणत अतिशय चांगली भेट झाल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये लिफ्टमध्ये झालेली भेट योगायोगाने घडली, त्याचा राजकीय अर्थ काढू नका' असे भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.