Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांनी योजनेचं 'चॉकलेट' दिलं; मोफत शिक्षण योजनेवरुन उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray Slams Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांनी योजनेचं 'चॉकलेट' दिलं; मोफत शिक्षण योजनेवरुन उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray Slams Chandrakant Patil Saam Tv
Published On

भाजप नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगावमध्ये मुलींना उच्च शिक्षण मिळेल, अशी घोषणा केली होती. परंतु अद्याप तक्याचा शासकीय जीआर निघालेला नाहीये. त्यावरुन ते विरोधकांच्या टार्गेटवर येत असतात. आज ते पुन्हा विरोधकांच्या रडावर आले. आज सकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेत विधीमंडळात त्यांनी त्यांचे स्वागत केलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं.

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं. त्यावरून ठाकरेंनी चंद्राकात पाटील यांना फटकारलं.

पावसाळी अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सरकारच्या घोषणांवरुन त्यांनी हल्लाबोल केलाय.सरकार अर्थसंकल्प मांडल्यानंतर काही योजनांची घोषणा करेल. परंतु या घोषणा फक्त घोषणाच राहतील, कारण या योजनांसाठी कोणताच निधी वापरला जाणार नाही. यामुळे हे गाजर घोषणा असतील, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सरकारकडून घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीच्या दुष्काळ जाहीर केला जाईल. हे आपण याआधीही म्हटलं आहे.

त्यामुळे सरकार परत तेच करणार आहे. जर सरकारला संवदेना असेल त्यांनी उद्या आतापर्यंत झालेल्या घोषणा किती पूर्ण झाल्यात. त्यांची अंमलबजावणी किती झाली याची माहिती खरेपणाने दिली तरी खूप होईल, अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना मारली. मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे 'लाडली बहना' योजना राबवली जाते, तशीच योजना राज्यात राबवणार असाल तर 'लाडला भैय्या' योजनाही राबवावी. स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता दोघांसाठी योजना आणावी. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी जे मोफत मुलींच्या शिक्षणाची घोषणा केली होती, ते पण एक चॉकलेट निघालं.

चंद्रकात पाटील यांनी आज सकाळी जसं मला चॉकलेट दिलं, त्यांनी त्या योजनेचं जनतेला चॉकलेट दिलं, परंतु ते पोकळ निघालं. त्यामुळे अशा पोकळ आणि अशा चॉकलेट आता देऊ नका, कारण जनतेची संयम क्षमता संपलीय. हे आपल्याला लोकसभेच्या निकालावरुन दिसून आलं आहे. जनता आता भोळी राहिली नाहीये. त्यामुळे उद्या कोणत्या योजनांची घोषणा करत असाल तर त्याची अंमलबाजवणी करा,असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिलाय.

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांनी योजनेचं 'चॉकलेट' दिलं; मोफत शिक्षण योजनेवरुन उद्धव ठाकरेंची टीका
Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटात जवळीक वाढली? उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीनं तुफान चर्चा, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com