Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तटस्थ चिन्हे देण्याचा पर्याय का विचारात घेतला नाही, असा सवाल उपस्थित केला.
Shiv Sena Symbol Case
Shiv Sena Symbol Row Supreme Court Questions Eci Over Neutral Symbolssaam tv
Published On
Summary
  • शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

  • न्यायालयाने दोन्ही गटांना तटस्थ चिन्हे देण्याचा पर्याय निवडणूक आयोगाने का विचारात घेतला नाही.

  • निवडणूक आयोगाने 2023 मध्ये ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाकडे कायम ठेवण्याचा निर्णय

शिवसेनेसंदर्भातील पक्ष आणि चिन्हा संदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जातोय. पक्ष आणि पक्ष चिन्हाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तटस्थ चिन्हे का दिली नाहीत,असा सवाल केलाय.

शिंदे गटाला विद्यमान शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा लाभ देण्याऐवजी, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तटस्थ चिन्हे का दिली नाहीत, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. "दोघांनीही बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे," अशी टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली.

Shiv Sena Symbol Case
'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी सुरूय. दुसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील नीरज किशन यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीत कोर्टाकडून निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देताना कोणते निकष वापरले असा सवाल विचारण्यात आला.

अंतरिम चिन्ह' हाच अंतिम उपाय असू शकत नाही का, असेही कोर्टानं म्हटल होतं. ती दोन तात्पुरती चिन्हे कायमस्वरूपी म्हणून चालू ठेवता आली असती का? निवडणूक आयोगाचे (ECI) तसे मत नव्हते.

Shiv Sena Symbol Case
Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

काल झालेल्या सुनावणीत काय झालं?

शिवसेनेची संघटनात्मक रचना प्रामुख्याने नामनिर्देशित सदस्यांनी बनलेली होती. ती पक्ष किंवा कार्यकर्त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब नव्हती. कार्यकर्त्यांची संख्या इतकी मोठी होती की त्यातील प्रत्येक सदस्याला आयोगासमोर हजर करणे शक्य नव्हते. निवडून आलेले प्रतिनिधी विभागले गेले होते आणि काहींना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तिन्ही निकषांच्या काही मर्यादा होत्या, असा दावा यांनी केला.

त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी थेट राखीव चिन्हाबाबत भाष्य केले. जर तिन्ही निकषांना मर्यादा असतील तर आणखी एक पर्याय उपलब्ध होता. कोणत्याही एका गटाला राखीव चिन्हाचा लाभ देण्याची गरज नव्हती. दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडण्याचे आणि बाळासाहेबांच्या ताकदीवर नव्हे, तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले जाऊ शकले असते, असे परखड मत न्यायमूर्ती बागची यांनी सुनावणीवेळी व्यक्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com