

एकनाथ शिंदेंनी ‘खरी शिवसेना आमचीच’ असा दावा केला.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे समर्थन केले.
शिंदे गटाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते म्हणजे मूळ शिवसेना असल्याची भूमिका मांडली.
शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे? यावर सध्या सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरूय. सुप्रीम कोर्टात शिंदे यांची बाजू मांडणारे वकील नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. राजकीय पक्षातील फुटीनंतर पक्ष कोणाचा हे आयोग ठरवतो. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे नेते म्हणजेच मूळ शिवसेना असा युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना खरी शिवसेना आमचीच, असा दावा केलाय. एकनाथ शिंदेच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
शिंदे यांची बाजू मांडणारे वकील नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले. राजकीय पक्षातील फुटीनंतर पक्ष कोणाचा हे आयोग ठरवतो. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे नेते म्हणजेच मूळ शिवसेना असा युक्तिवाद करत ठाकरे गटाच्या युक्तिवादाचीही चिरफाड केली. वकील नीरज कौल म्हणाले की सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा युक्तिवादच चुकीच्या मुद्द्यांवर आधारे केला गेलाय.
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल केले गेलेत. पक्षाची रचना एका व्यक्तीच्या मर्जीनं झाली होती. एका सहीनं जर जबाबदारी मिळत असेल तर कार्यकर्त्यांचे महत्व काय? आम्हाला कोर्टाला काही कागदपत्रं सादर करायची आहेत. पक्षांतर्गत निवडणुका घ्या, असं निवडणूक आयोगानं वेळोवेळी सांगितले होते, सांगूनही पक्षातील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या.
शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे पक्षात एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता, असा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचं वकिलांनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टात वकिलांनी दावा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमाशी संवाद साधताना पक्षांवर आपला दावा सांगितलाय. कोर्टात शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे खर आहे ते बाळासाहेबांची घटना बाळासाहेबांचे विचार ते नंतर कसे पायदळीत तुडवले हे महाराष्ट्राने पाहिलेल आहे, ते देशानेही पाहिलेल आहे. त्यामुळे त्यांची घटनाही बदलली त्यांचे विचारही बदलले सगळंच बदललं.
त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची त्यांची जनतेने देखील म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवले. यामुळे जनेतेनं त्यांचा पाठिंबा गोठवला. त्याचबरोबर ठाकरेंनी हिंदुत्व गोठवलं, आता धनुष्यबाण देखील गोठवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे या महाराष्ट्रातल जनतेने जो काही निर्णय घेतला तो आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे त्यांनी स्वीकारले त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि त्यामुळे खरं आहे ते म्हणजे शिवसेना आमची आहे.
आम्ही दुसऱ्या पक्षासोबत गेलो नाहीत, आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय. आम्ही पक्षांतर केलं नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बदलले त्यांनी दुसरा निर्णय घेतला. परंतु हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं त्यावर सखोलपणे बोलू शकत नाही.शिवसेनेत हुकूमशाही होती असा आरोपावर शिंदे म्हणाले की, हो बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ती परिस्थिती उद्धवलीय. मनमानी होऊ लागली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.