Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

MLA Sanjay Gaikwad Case : महिलांच्या शारीरिक ठेवणीवर कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम ७९ अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली.
MLA Sanjay Gaikwad Case
MLA Sanjay Gaikwad CaseSaam tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Sanjay Gaikwad controversial statement about women : बाप तो बाप रहेगा... पण एखाद्या बाईने हे म्हटलं तर तिने बापासारखं शरीर कुठून आणायचं? असं म्हणत महिलांच्या शारीरिक ठेवणीवर जाहीरपणे वादग्रस्त टिप्पणी करणे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच भोवले आहे. या असंसदीय आणि लज्जास्पद वक्तव्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल झाल्याच्या या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या आठवड्यात चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत "बाप तो बाप रहेगा..." हे गाणे वाजवण्यात आले होते. या गाण्याबाबत प्रसारमाध्यमांनी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी महिलांच्या शरीराबद्दल उपहासात्मक विधान केले.

"हे वाक्य पुरुषाने बोलले तर ठीक आहे, पण बाईने म्हटलं तर बापासारखं शरीर ती कुठून आणणार?" असे म्हणत त्यांनी अयोग्य हातवारेही केले, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. हे वक्तव्य आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

MLA Sanjay Gaikwad Case
१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

महिलांच्या लज्जेला धक्का

आमदार गायकवाड यांचे हे विधान समस्त स्त्री जातीचा अवमान करणारे, उपहासात्मक आणि लज्जा उत्पन्न करणारे आहे, असा आरोप करत रामदेव बाबा नगर येथील ४२ वर्षीय महिला तक्रारदार सविता भगवान बेंडवाल यांनी पोलिसांत धाव घेतली. आमदारांनी हे कृत्य हेतुपुरस्सर केले असून यामुळे मानसिक त्रास झाल्याचे तक्रारीत म्हटले.

MLA Sanjay Gaikwad Case
माजी मुख्यमंत्र्यांच्या PA च्या घरावर ईडीची धाड! ३२ लाख कॅश, २० तोळं सोनं अन् महागडी घड्याळे जप्त; राजकीय वर्तुळात खळबळ

पोलीस कारवाई आणि कलम

महिला तक्रारदाराच्या अर्जावरून बुलढाणा शहर पोलिसांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ७९ (महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य किंवा शब्द वापरणे). यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुषमा रामभाऊ पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान,

आमदारावरच थेट गुन्हा दाखल झाल्याने बुलढाण्याच्या राजकीय वातावरणात मोठा भूकंप आला असून पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com