१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

Manoj Jarange march route : मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे पदयात्रा काढणार आहेत. पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथे मुक्काम करत १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार आहे.
Manoj Jarange march route
Manoj Jarange march route Saam TV marathi
Published On

Manoj Jarange Patil announces Mumbai Maratha protest march : मराठा आरक्षणाच्या आरपारच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 'अंतिम युद्धाची' घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अंतरावली सराटीतून मराठ्यांची ही भव्य पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली असा टप्प्याटप्प्याने प्रवास करत ही पदयात्रा १९ सप्टेंबर रोजी मुंबईत धडकणार असून, त्याच दिवशी आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

ही आपली अंतिम अन् निर्णायक लढाई आहे. आपल्याला मुंबईत जायचे आहे आणि जिंकूनच परत यायचे आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत मुंबई आंदोलनाची घोषणा केली. अंतरावली सराटी येथे आयोजित या बैठकीतून त्यांनी आझाद मैदानावरील पदयात्रेचा संपूर्ण मार्ग आणि आंदोलकांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी निघण्याची तारीख जाहीर केली. मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना होणार आहे.

मुंबई आंदोलनाचा ५ मुक्कामांचा 'मास्टर प्लॅन'

मनोज जरांगे यांनी आंदोलकांना ठराविक मार्गानेच मुंबईकडे येण्याचे आवाहन केले आहे. पदयात्रेचा टप्पा आणि मुक्काम त्यांनी सांगितला.

१५ सप्टेंबर - पहिला मुक्काम: पाटोदा (जि. बीड)

१६ सप्टेंबर -दुसरा मुक्काम: श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर)

१७ सप्टेंबर -तिसरा मुक्काम: हडपसर (जि. पुणे)

१८ सप्टेंबर - चौथा मुक्काम: खोपोली (जि. रायगड)

१९ सप्टेंबर - पाचवा दिवस: थेट आझाद मैदान, मुंबई (येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार)

मुंबईत न्याय मिळाल्याशिवाय आता माघारी फिरायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत जरांगेंनी ठरवून दिलेल्याच मार्गाने मार्गस्थ होण्याचे आदेश सर्व मराठा बांधवांना दिले आहेत.

Manoj Jarange march route
राजकीय वर्तुळात खळबळ! मराठा आंदोलकांचा लक्ष्मण हाकेंवर हल्ला, सोलापुरातील हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?

फडणवीस साहेब, मराठ्यांना अडवू नका; अडवले तर रस्त्यावरच झोपू

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जरांगे म्हणाले, मी गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरावली ते मुंबई दरम्यान कुठेही आंदोलकांना अडवू नका. फडणवीस साहेब मराठ्यांना अडवणार नाहीत, याची मला खात्री आहे. यापूर्वी दोनदा आपण मुंबईला गेलो, तेव्हा आपल्याला अडवले गेले नाही. जर एखाद्या ठिकाणी पोलिसांनी अडवलेच, तर वाहने बाजूला लावून शांततेत डांबरावर (रस्त्यावर) झोपायचे, पण संयम सोडायचा नाही.

आंदोलकांसाठी कडक सूचना : दगडफेक अन् जाळपोळ केल्यास आंदोलन मागे

न्यायव्यवस्थेचा पूर्ण सन्मान करत शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन पार पडेल, यावर जरांगेंनी विशेष भर दिला. न्यायदेवतेचा आपल्याला सन्मान करायचा आहे. सर्वांनी शांततेतच जायचे आणि यायचे आहे. दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसाचार करायचा नाही. नियम आणि पोलिसांना सहकार्य करायचे आहे. कोणीही नियम मोडला किंवा हिंसाचार केला, तर मी थेट आंदोलन मागे घेईन. संपूर्ण राज्याला शांततेचे आश्वासन द्यावे लागेल, असे त्यांनी ठामपणे बजावले.

Manoj Jarange march route
Manoj Jarange : जरांगेंना मुंबईत येण्याआधीच अटक करा, हाकेंचा'सलाईन'वरून केला खळबळजनक संशय

रक्त सांडले तर १० मिनिटांत शांततेत 'महाराष्ट्र बंद'

मुंबईत येऊ न शकणाऱ्या मराठा बांधवांनी आपापल्या भागात ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, "जर या आंदोलनादरम्यान एकाही आंदोलकाचे रक्त सांडले, तर संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या १० मिनिटांत शांततेच्या मार्गाने 'महाराष्ट्र बंद' पाळला जाईल," असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.

जीआर थोतांड अन् जायकवाडीच्या पाण्याचा इशारा:

सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरवर (GR) टीका करताना जरांगे म्हणाले, "शपथपत्राद्वारे प्रमाणपत्र मिळणार नाही, असे सांगत असाल तर सरकारने हा जीआर कशाला काढला? हे सगळे थोतांड आहे." याच वेळी त्यांनी मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित केला. "माझे हे आंदोलन संपू द्या, त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात जायकवाडीचे पाणी फिरवेन, नाहीतर जायकवाडीत पाणीच येऊ देणार नाही. मराठवाड्यातील एकही गाव कोरडे राहू देणार नाही," असा इशारा त्यांनी शेवटी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com